आता औषध खाण्याची आठवण करून देणार डिजिटल गोळी!

  आता  औषध खाण्याची आठवण करून देणार डिजिटल गोळी !


🎇 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  🎇
____________________________
दि. १३ फेब्रुवारी २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/3afFh6y
             वॉशिंग्टन : गंभीर आजाराशी झुंजत असलेला एखादा रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलमधून घरी जातो त्यावेळी त्याच्याकडून योग्यवेळी औषधांचे सेवन होणे गरजेचे असते. आता त्यासाठी अमेरिकेतील मिनेसोटा युनिव्हर्सिटीतील एडवर्ड ग्रीनो यांनी एक अशी गोळी (टॅबलेट) बनवली आहे जी पोटात जाऊन तेथूनच डॉक्टर व रुग्णाला त्याच्या औषध सेवनाची माहिती देऊ शकेल. या डिजिटल पिलमध्ये एक छोटा सेन्सर असून त्याच्या सहाय्याने ही माहिती मिळेल.

आता  औषध खाण्याची आठवण करून देणार डिजिटल गोळी !


हा सेन्सर औषधासमवेत पोटात गेल्यावर पोटाच्या वरील भागात लावलेल्या एका पॅचला सिग्‍नल मिळेल. हा पॅच मोबाईल अ‍ॅपशी जोडलेला असेल. त्याच्या सहाय्याने डॉक्टर व रुग्णाला औषध सेवनाबाबतची आधीची सर्व माहिती समजू शकेल. या रुग्णाने कधी औषध खाल्ले व आता कधी खावयाचे आहे हे यामधून स्पष्ट होईल. डॉक्टरांना आपला रुग्ण वेळेवर औषधसेवन करतो आहे की नाही हे समजू शकेल. तसे घडत नसल्यास त्याबाबतची रुग्णाला जाणीव करून देता येऊ शकेल. या डिजिटल पिलमधील सेन्सर एखाद्या धान्याच्या कणाइतक्या आकाराचा असेल. तो गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये सहजपणे मिसळू शकतो.

🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম