⭕ मुतखड़ा उपचार ⭕
_________________________
우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우
________________________
🌹तारीख 26 मार्च 2021🌺
_______________________
फेसबुक लिंक http://bit.ly/2PvsNQB
मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2 चमचे घ्यावे.एक उपाय म्हणजे पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करावा. हा उपाय लागू पडल्यास लघवीतून खडयाची खर बाहेर पडताना जाणवते.
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
औषध चालू केल्यानंतर आठ-दहा दिवसांत हा परिणामदिसणे अपेक्षित आहे.याचबरोबर कुळीथाचा काढा (25 ग्रॅम कुळीथ + 200 मि.ली. पाणी मंद आचेअर उकळून 50 मि.ली द्रव तयार करणे) रोज द्यावा. असे तीन ते सात दिवस देऊन तीन-चार आठवडे थांबून परत 3 ते 7 दिवस हाच उपाय करावा.पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य कराव्यात.============
होमिओपथी निवड
============
चामोमिला, लायकोपोडियम र्बेरिस व्हल्गॅरिसचा द्राव 3/4 थेंब पाण्यात टाकून दिवसातून दोन वेळा रोज घ्यावा.मुतखडा हा विकार सुरवातीच्या अवस्थेमध्ये असल्यास औषधांद्वारे बरा होऊ शकतो. मात्र वेळीच योग्य उपचार न केल्यास मुतखड्याच्या आकारातवाढ होते. अशा वेळी शस्त्रक्रमाद्वारे मुतखडा काढावा लागतो.'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
✆ 9890875498
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
Tags
आरोग्य