या अंधश्रद्धेमुळे इमारतीना १३ वा मजला नाही

 या अंधश्रद्धेमुळे  इमारतीना १३ वा मजला नाही   


दि. १ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/39tUwbz
    जगातील इतर शहरांसारखं मुंबई देखील खास प्रसिद्ध आहे ते गगनचुंबी आणि भल्यामोठ्या ईमारतींसाठी! पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का?
❗या दिमाखदार इमारतींपैकी अनेकांमध्ये १३ वा मजला तुम्हाला सापडणारच नाही…!

या अंधश्रद्धेमुळे  इमारतीना १३ वा मजला नाही


कधी मुंबईमधल्या प्रसिद्ध हॉटेल्स किंवा इमारतींमध्ये गेलात ज्यांना १३ पेक्षा जास्त मजले आहेत, तर लिफ्ट मध्ये गेल्यावर १३ नंबरचा आकडा शोधा. ९०% इमारतींमध्ये तुम्हाला १३ नंबरचे बटन सापडणारचं नाही. काय दचकलात ना हे ऐकून? चला तर मग जाणून घेऊया या मागचं कारण आहे तरी काय!
❗सगळ्यात पहिलं हे समजून घ्या की ही लोकांची श्रद्धा (अंधश्रद्धा?) आहे.
इमारत बनवणारे बिल्डर्स १३ क्रमांकाचा आकडा हा अशुभ मानतात. त्यांच्या मते शुक्रवारी जर १३ तारीख आली तर ती अजून अशुभ असतें, कारण या वेळेस दुष्ट शक्ती जाग्या होतात. *आणि या गोष्टीचे पुरावे म्हणून हे लोक शुक्रवारी १३ तारीख आलेल्या दिवशी जगभरात आजवर घडलेल्या अनेक वाईट घटनांचे दाखले देतात. बिल्डर्स १३ वा मजला न बांधता स्वत:च्या मनाला अशी खात्री करून देतात की आता आपली बिल्डींग सुरक्षित आहे. त्यावर कोणत्याही वाईट शक्तींचे सावट नाही. एखादी इमारत ३० मजल्याची असेल तर १३ व्या मजल्याला १३ क्रमांक न देता त्याला १४ क्रमांक दिला जातो.
नरीमन पॉइंट वरच हॉटेल ट्रायडंट तर सर्वांनाच माहित असेल. मुंबईमध्ये केवळ या हॉटेलच्या इमारतीमध्ये १३ वा मजला आहे. पण या मजल्याला टाळा लावून ठेवला आहे. येथे येण्याची परवानगी कोणालाही दिली जात नाही. हॉटेल ट्रायडंटच्या व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात येते की,पूर्वी हा मजला सुरु होता. अनेक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा येथे राबता असायचा, परंतु कालांतराने या १३ व्या मजल्यावर अनेक विचित्र गोष्टी अनेक जणांनी पहिल्या आहेत. तसेच या मजल्यावरून बऱ्याचदा भयानक आवाज येत असतात. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मजला बंद ठेवण्यात आला आहे. नरीमन पॉइंट वर अजून एक होईचस्ट हाउस म्हणून इमारत आहे. या इमारतीमध्ये १३ व्या मजल्यावर राहून गेलेल्या रहिवाश्यांनी अशी तक्रार केली की,बाथरुममधून सारखा नळातून पाणी टपकण्याचा आवाज येतो, पण जेव्हा आम्ही जाऊन बघितले तर नळ पूर्णपणे बंद होता. आणि कुठेही पाणी दिसत नव्हते.

मुंबईमध्ये मेकर चेम्बर्स IV नावाचे अजून एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या इमारतीमधील १३ व्या मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार केली की,मजल्यावरच्या लाईट्स बंद असल्या तरी त्या सारख्या चालू-बंद होत असतात. अनेकवेळा त्यांची दुरुस्ती देखील केली, पण हा प्रकार सतत सुरु होता.
बरं हे १३ क्रमांकाचं प्रकरण केवळ मुंबईमध्ये आहे असं काही नाही. भारतातील इतर शहरांमध्ये देखील १३ आकडा टाळला जातो. अहो अमेरिका देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. अमेरिकेमधील ८५% इमारतींमध्ये तुम्हाला १३ वा मजला सापडणार नाही.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ‼
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম