मुळव्याध दूर करण्याचा घरगुती उपाय

मुळव्याध दूर करण्याचा घरगुती उपाय 

फेसबुक लिंक http://bit.ly/2NVsaPG
1) जिरं भाजून त्याची पूड करावी. ही पूड गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यास रात्री झोप झोपण्यापुर्वी घेतल्यास 3 ते 4 दिवसांत तुम्हाला आराम मिळेल. जिरं हे फायबर युक्त असून पोटातील वायू कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे मळ सैल होतो व शौचास साफ होते...

मुळव्याध दूर करण्याचा घरगुती उपाय

2) - मुळव्याधीवर गुलाब देखील उपयुक्त आहे. आश्चर्य वाटले ना? हो. 10-12 गावठी गुलाबाच्या ( सुरक्षित पद्धतीने वाढवलेल्या) पाकळ्या कुटून 50मिली पाण्यात टाकून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास नक्किच आराम मिळतो...

3) मुळव्याधीच्या त्रासात जर रक्त पडत असेल तर कांद्याचा रस जरूर घ्या. यासाठी 30 ग्राम कांद्याचा रस व 60 ग्राम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्या...

4) डाळींबाच्या साली टाकाऊ नसतात . मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाच्या सालीदेखील तितक्याच उपयुक्त आहेत.अर्धाकप उन्हात सुकवलेल्या डाळींबाच्या साली 30मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.त्यात 1 चमचा जिरं , 3/4 कप ताक व मीठ घालून मिश्रण एकत्र करा. मुळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी हे मिश्रण आठवड्यातून तीन वेळेस घ्यावा...

5) मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी तसेच पोट साफ़ होण्यासाठी मुळा फार उपयुक्त आहे. 60 ग्राम मुळ्याच्या ताज्या रसात मीठ घालून ते मिश्रण आठवड्यातून दोनदा सलग 40 दिवस घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल...

6) तीळ कुटून त्याची पेस्ट मोडांवर लावल्यास , आराम मिळतो. तसेच अर्धा चमचाभर तिळ बटरमध्ये एकत्र करून खाल्ल्यानेदेखील आराम मिळतो...

7) स्त्रियांमध्ये मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी दुर्वा फार उपयुक्त आहेत . २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून घ्या. हे मिश्रण गाळून रोज घेतल्यास मुळव्याधीपासून आराम मिळेल...

8) वेदना , सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक फार हितकारी आहे. मूळव्याधीच्या त्रासात गुदद्वारापाशी वेदना होत असल्यास पाठीवर झोपून बर्फाचा जास्तीत जास्त १० मिनिटांसाठी शेक द्यावा.

दुसरा ऊपाय ::

या उपायाने एका दिवसात रक्तस्त्राव बंद होतो. हा एक साधा आणि सोप्पा उपाय आहे. चला पाहू काय आहे हा उपाय.
🔹तयार करण्याची कृती :
नारळाच्या किशीने (जटेने) करा मूळव्याधीचा इलाज. सर्व प्रथम तुम्ही नारळाची कीशी घ्या. तिला माचिस ने जाळून टाका. जळल्या नंतर जे भस्म बनेल (राख होईल) त्यास एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
वापरण्याची पद्धत आणि त्याचे अन्य फायदे
एक ते दीड कप ताकामध्ये (छाछ) किंवा दही घेऊन त्यामध्ये नारळाच्या किशीचे भस्म तीन ग्राम मिक्स करून रिकाम्या पोटी दिवसातून 3 वेळा एक दिवसच घ्यायचे आहे. लक्षात ठेवा ताक किंवा दही ताजे असावे आंबट नसावे. कितीही जुना पाइल्स चा आजार असला तरी एक दिवसात ठीक होतो.
हा उपाय कोणत्याही प्रकारच्या रक्तस्त्राव थांबवण्यास प्रभावी आहे. महिलांच्या मासिक धर्म मध्ये जास्त रक्तस्त्राव किंवा श्वेत प्रदर च्या आजारात हे फायदेशीर आहे
हे औषध घेतल्यावर एक तास अगोदर आणि एक तास नंतर काही खाऊ नये. जर आजार फार जुना असेल आणि एका दिवसात फरक वाटत नसेल तर दोन तीन दिवस घेऊन पहा.
मुळव्याध एकदा ठीक झाल्यावर पथ्य पाळावीत जास्त तिखट-मसालेदार पदार्थ, उत्तेजक पदार्थ, गरम प्रवृत्ती वाले पदार्थ खाऊ नयेत यामुळे मुळव्याध पुन्हा होण्याची शक्यता असते.
मुळव्याध पासून वाचण्यासाठी कधीही गरम पाण्याने पाश्वभाग धुवू नये. उन्हाळ्यात टाकीचे पाणी गरम होते अश्या वेळी हे गरम पाणी वापरणे टाळावे.

_______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_______________________________
_________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম