तामीळनाडूतील या गावात लोक चप्पल,बुट वापरत नाहीत
दि. २७ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3tZcs5v
दक्षिण भारतातील एका गावात चक्क चप्पल आणि बूट वापरण्यास बंदी आहे. या गावात 130 कुटुंब राहत असून त्यातील बहुतांशी लोक हे शेतकरी किंवा मजुर आहेत. पण या गावाचे वैशिष्टेय म्हणजे या गावातील लोक चप्पल किंवा बुट घालत नाही. याबाबत प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हा नियम गावातील एका देवीच्या सन्मानार्थ पाळत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर कोणावरही जबरदस्तीने हा नियम लादण्यात आला नाही. असे करण्यास कोणालाही बळजबरीने सांगण्यात आले नाही. तर या नियमाचे लोक स्वच्छेने पालन करतात. लोक गावाबाहेर जाण्यासाठी हातात बुट-चप्पल घेऊन जातात.गावात प्रवेश घेण्यापूर्वी त्या ठिकाणी लोक आपले पायातील बुट-चप्पल काढून हातात घेतात. गावातील फक्त वयोवृद्ध आणि आजारी लोक बुट-चप्पल पायात ठेवतात. गावातील एका महिलेने सांगितले की, ते गावाबाहेर जाताना देखील बुट-चप्पलांची काळजी करत नाहीत. हा नियम गावाबाहेरून गावात येणाऱ्या लोकांना देखील सांगितला जातो. पण कोणताही दबाव त्यांच्यावर टाकला जात नाही. गावात राहणारी अंबुने नितीने सांगितले की, मला माझ्या आईने सांगितले की, आपल्या गावची मुथियालम्मा नावाची एक शक्तिशाली देवी रक्षा करते आणि त्याच देवीच्या सन्मानार्थ आम्ही चप्पल-बूट वापरत नाहीत. ती पुढे बोलतांना म्हणाली की, जर मला वाटले तर मी चप्पल घालू शकते पण तसे करणे एखाद्या चांगल्या मित्राचा अपमान करण्यासारखे होईल. लोकांच्या मते, कोणी हे काम कोणाच्या दबावामुळे नाही तर स्वखुशीने करतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, खूप मोठी विचित्र गोष्ट ही परंपरा सुरु होण्यामागे आहे. गावातील 62 वर्षीय लक्ष्मणन वीरभद्र यांच्या मते, गावकऱ्यांनी 70 वर्षांपूर्वी गावाबाहेर एका लिंबाच्या झाडाखाली मुथियालम्मा देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती.
देवाचा श्रृगांर करून पुजारी पूजा करत होते. तेवढ्यात एक युवक तेथे बुट घालून मूर्तीजवळून गेला. वीरभद्रच्या मते, त्या दिवशी व्यक्ती पाय घसरून पडला. संध्याकाळ होईपर्यंत त्याला ताप आला. महिन्याभरानंतर त्याचा ताप कमी झाला. पण वीरभद्रच्या मते, देवी त्या व्यक्तीच्या चुकीमुळे नाराज झाली की दुसऱ्या कारणामुळे त्याला त्रास सहन करावा लागला हे सांगता येणार नाही. पण या गावातील लोकांनी या घटनेनंतर बुट-चप्पल न घालता राहतात. असे राहणे त्यांच्या जीवनाचा एक घटक बनले आहे.
____________________________
wꀡ▲㈦ㄅ▲℗℗ 9890875498* ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________
Tags
नवल