येथे पत्नीला बनवले जाते कुरूप

येथे पत्नीला बनवले जाते कुरूप   


🌹तारीख  28 मार्च 2021
_____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/2O01D3T
आपली पत्नी सुंदर आणि आकर्षक दिसावी अशी बहुतेक पुरुषांची इच्छा असते. तिचे ते सौंदर्य टिकून राहावे यासाठी ते तिच्या सौंदर्य प्रसाधनांवर हजारो रुपयेही खर्च करतात.पण म्यानमार मध्ये राहणाऱ्या चीन आणि मुन या आदिवासी जमातीमध्ये मात्र पत्नीला कुरूप बनवण्यासाठी चढाओढच लागलेली असते. तिला कुरूप बनवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर जनावरांच्या चरबीने टॅटू काढले जातात. एवढेच नाही तर त्याचा रंग उतरू नये म्हणून झाडांच्या रंगाचा वापर केला जातो. या रंगांमुळे महिलेच्या शरीरावरील टॅटू  गडद दिसतात आणि ती भेसूर दिसू लागते. या टॅटूमुळे तिचे मूळ सौंदर्य तर संपतेच पण तिचा चेहरा आणि शरीरही भयानक दिसू लागते. यामुळे परपुरुष तिच्याकडे आकृष्ट होत नाहीत.
हे टॅटू शरीरावर काढून घेतानात्या महिलेला इतक्या तीव्र वेदना होतात की बरयाचवेळा ती बेशुद्धही पडते. पण तरीही तिच्या शरीरावर टॅटू काढायचे काम सुरू असते.चीन आणि मुन जमातीत महिलांच्या शरीरावर टॅटू काढण्याची ही परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे.या जमातीतील लोकांच्या म्हणण्यानुसार शेकडो वर्षापूर्वी म्यानमारवर एक दृष्ट राजा राज्य करत होता. भोगी आणि विलासी वृत्ती असलेल्या या राजाची महिलांवर वाईट नजर असे. सुंदर महिला त्याच्या दृष्टीस पडताच तो तिला पळवून न्यायचा आणि तिला आपली दासी बनवायचा. राजाच्या या विलासी वृत्तीला प्रजा कंटाळली होती. पण त्याच्याविरोधात आवाज उठवण्याची हिंमत कोणातच नव्हती. यामुळे महिलांनाच कुरुप बनवण्याचा निर्णय या जमातीने घेतला. तेव्हापासून आजतागयत ही परंपरा आदिवासींनी कायम ठेवली आहे.
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖
✆ 9890875498

येथे पत्नीला बनवले जाते कुरूप


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম