श्रीलंकेतील ‘अॅडम्स पीक’
डोंगराचा रामायणाशी संबंध
_दि. १० मार्च. २०२१_
•
फेसबुक लिंक http://bit.ly/2PGAcwk
❏ कोलंबो : भारतीय संस्कृतीतील विविध घटकांचा श्रीलंकेतील काही ठिकाणांशी संबंध नेहमी जोडला गेला आहे. रामायण हा त्यातीलच एक भाग. श्रीलंकेतील ‘अॅडम्स पीक’ या डोंगरावरील असणारे प्रार्थनास्थानाचे भगवान शंकर आणि रामायण काळाशी संबंध जोडला जातो. श्रीपाद नावानेही या डोंगराची ओळख आहे. रतनपूर जिल्ह्यात असलेले हे डोंगर घनदाट जंगलात आहे. या ठिकाणाला मौल्यवान खड्यांसाठी सुद्धा ओळखले जाते.
आख्यायिकेनुसार, राम आणि रावणात युद्धाच्या वेळी लक्ष्मण मेघनादच्या बाणाने जखमी झाले होते. त्यांचा जीव फक्त संजीवणी बुटीनेच वाचवले जाणे शक्य होते. ते आणण्याचे कार्य राम भक्त हनुमानला सोपविण्यात आले होते. हनुमान हिमालयाच्या कुशीत संजीवनी बुटी शोधत होते. परंतु, त्यांना ती बुटी नेमकी कोणती हे कळत नव्हते. तेव्हा त्यांनीत्या डोंगराचा एक तुकडाच घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. डोंगराचा तो तुकडाच आज श्रीलंकेत श्रीपदा या नावाने ओळखला जातो, अशी ही आख्यायिका आहे. सुमारे 2200 मीटर उंचीवर असलेले हे डोंगराला श्रीलंकेतील स्थानिक यास रहुमाशाला कांडा असेही म्हणतात. याच डोंगरावर एक मंदिर आहे. या डोंगरावर असलेलेमंदिर भगवान महादेवाच्या पायांच्या खुणांमुळे प्रसिद्ध आहे. हिंदू धर्माच्या आख्यायिकेनुसार, पायाच्या या खुणा भगवान शिवशंकराच्या आहेत.
---------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
-----------------
ʕ•̫͡•ʕ•̫͡•ʔ•̫͡•ʔ•̫͡•ʕ•̫͡•ʔ•̫͡•ʕ•̫͡•ʕ•̫͡•ʔ•̫͡•ʔ•̫͡•ʕ•̫͡•ʔ•̫͡•ʔʕ•̫͡•ʕ•̫͡•ʔ•̫͡•ʔ•̫͡•ʕ•̫͡•ʔ•̫͡
Tags
माहिती