खतरनाक शिकार
सात आठ शिकारी पैकी एकजण आपल्या पायाला लेप व कापड लावुन अजगराच्या बिळात आपला पाय सोडून अजगरास डिवचतो.भुकेला अजगर त्या शिकारयाच्या पायास शिकार समजुन गिळु लागतो. फुट दीड फुट पाय अजगराने गिळल्यानंतर तो इतर शिकारयाना खुण करून स्वत ला वर अोढण्यास सांगतो. त्याप्रमाणे ते शिकारी त्याला बाहेर अोढुन घेतात.शिकारयाच्या पावाबरोबर तो अजगरही बाहेर येतो त्यावेळी एकजण त्या अजगरास तोंडापासून फाडण्यास सुरूवात करून त्या शिकारयाचा पाय मोकळा करतात. व अजगराचे तुकडे करून ते मांस खातात.ही शिकार २० ते २५ जणांना पुरते.
Tags
माहिती