पेठवडगावचा किल्ला

  पेठवडगावचा किल्ला  




      
तारीख  २६ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3soA3fn
पेठवडगावचा किल्ला हे शिर्षक वाचुन दचकला ना,पण हे पेठवडगाव कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील पेठवडगाव आहे. हिंगोली जिल्हा (ता. कळमनुरी) येथील शिवकालीन ऐतिहासिक वारसा जपणारा किल्‍ला शालेय विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. निजाम व इंग्रजांना जेरीला आणणारे नवसाजी नाईकदेखील काही दिवस किल्‍ल्‍यावर वास्‍तव्याला होते. मात्र, ऐतिहासिक किल्‍ल्‍याकडे पुरातत्‍व विभागाचे दुर्लक्ष होत असून विकास करणे गरजेचे झाले आहे.
पेठवडगावचा किल्ला

पूर्वी किल्‍ले वडगाव व पेठवडगाव ही दोन्ही गावे किल्‍लेवडगाव अंतर्गत होती. त्‍यानंतर गावाचे विभाजन झाले. आता हा किल्‍ला पेठवडगाव गावच्या शिवारात आहे. मात्र, पूर्वी किल्‍ल्‍याच्या नावाने या गावाला किल्‍ले वडगाव असे नाव पडले आहे. या किल्‍ल्‍याला चारही बाजूंनी बुरूज आहेत. शिवाय किल्‍ल्‍यात अनेक भुयारी मार्ग सापडतात.
 किल्‍ल्यावरील एका दगडावर शिवराज मुद्रा असलेली लिपी पाहावयास मिळते.माहूरचे संस्‍थानिक राजे उदाराम देशमुख यांच्या अधिपत्‍याखाली हा किल्‍ला असल्याचे ग्रामस्‍थ सांगतात.
या शिवाय अनेक ऐतिहासिक घटनांशी नाते किल्‍ल्‍याचे जुळलेले आहे. किल्‍ल्‍याचा कारभार रायबागन नावाची महिला पूर्वी पाहत असे. तसेच एकाच वेळी निजाम व इंग्रजांना जेरीला आणणारे नवसाजी नाईक हेदेखील काही दिवस या किल्‍ल्‍यावर वास्‍तव्य करून होते. १८५७ च्या काळात तब्‍बल वीस वर्षे उठाव चालला होता. या उठावाचे सरदार नवसाजी नाईक हे होते. नवसाजी नाईक यांना इंग्रज सरकारने नाव्हा (ता. हदगाव) गावात घेरले असता ते घरातून भुयारी मार्गाने या किल्‍ल्‍यात आल्याचे येथील गावकरी सांगतात.
नवसाजी नाईक
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात पराक्रम गाजवलेल्या हाटकर वीरांचा नवसाजी नाईक हे वंशज होते.नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यात नोवासजी नाईक यांनी निजामाला मांडलिक होण्यास नकार दिला. त्यांनी स्वतःला स्वतंत्र राजा घोषित केले आणि निजामाच्या विरुद्ध बंड पुकारले.यासाठी मस्के नाईक, पोले नाईक, गडदे नाईक व अनेक ज्ञात अज्ञात हाटकर वीर आणि शेतकरी तरुण यांची प्रबळ संघटना ऊभी केली.निजामाने  नवसाजी नाईक आपणास दाद देत नाही म्हणुन ब्रिटिश सरकारकडे दाद मागितली.खुद्द निजाम ब्रिटिश सरकारचा मांडलिक होता.८ जानेवारी १८१९ साली अचानक नोव्हाच्या गढीवर मेजर पिट्सन, कॅप्टन इव्हान, कॅप्टन टेलर यांसह इंग्रजांनी हल्ला केला. सोबत ५ हजारांचे  सैन्य होते.पण नोवाजिनी गनिमी कावा लढयाचा वापर करून इंग्रजाविरूध्द लढाई चालू ठेवली,सुमारे महिनाभर ही लढाई चालू होती.इंग्रजाकडे आधुनिक हत्यारापुढे नाईंकाचे काही चालले नाही.त्यांच्या सैन्याकडे पारंपरिक तलवार,भाला ही हत्यारे होती तर बलाढय़ इंग्रज सैन्य बंदुकीचा जास्त वापर करीत होते.सुमारे ४०० जवान धारातीर्थी पडले तर इंग्रजाचे १८० सैनिक कामी आले.नोवसाजी नाईक हे इंग्रजांच्या कचाट्यातून पळाले. पण फितुरीमुळे ते इंग्रजाना सापडले. लढाईची दगदग व कॉलरा रोगाची साथ यामुळे त्यांचा मुत्यु झाला.
मेजर बर्टन यांनी आपल्या A History of the Hyderabad Contingent या पुस्तकात या बंडाचा विशेष उल्लेख केला आहे.
नवरात्रात विविध धार्मिक कार्यक्रम
अनेक भुयारी मार्ग अजूनही किल्‍ल्‍यात आहेत. या किल्‍ल्‍यावर देवीचे मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. किल्‍ल्‍याचे प्रवेशद्वार दगडी बांधणीचे आहे. मात्र, दिवसेंदिवस किल्‍ल्‍याची पडझड होत आहे. गुप्त धनाच्या आशेने अनेकांनी ठिकठिकाण खड्डे खोदल्याचे दिसून येते. किल्‍ल्‍यातील ऐतिहासिक बारव गाळाने भरलेली आहे. येथे किल्‍ल्‍यावर जाण्यासाठी पायऱ्या व पथदिवे तेवढे बसविण्यात आले आहेत.
▪️पूर्वी किल्‍ले वडगावच्या नावाने ओळखला जाणारा किल्‍ला सध्या पेठवडगावच्या शिवारात आहे. मात्र, दुर्लक्षित झालेल्या किल्‍ल्‍याचे जतन करणे गरजेचे झाले आहे. सोयीसुविधादेखील उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
संदर्भ; सुमितराव लोखंडे पाटील (मरहट्टी संशोधन विकास मंडळ 

💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव  
✆ 9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম