भारतीय इतिहासातील तांत्रिक ज्ञानाची साक्ष देणारं १४०० वर्षे जुने ‘सूर्य घड्याळ’!
हे ऐतिहासिक उपकरण म्हणजे चोल राजवटीतील वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक आहे
दि. २६ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2NRILDY
भारतीय इतिहासातील तांत्रिक ज्ञानाची साक्ष देणारं हे ऐतिहासिक उपकरण तामिळनाडूत आहे. तंजावुर जिल्ह्यापासून जवळपास १२ किलोमीटर लांब असलेल्या तिरुविसानालुरच्या शिवोगीनाथर मंदिराच्या ३५ फूट उंच भिंतीवर हे घड्याळ आहे. तब्बल १४०० वर्षांपूर्वी निर्माण केलेलं हे सूर्य घड्याळ म्हणजे तामिळनाडू मधील एकमेव ‘भिंतीचे घड्याळ’ आहे.हे ऐतिहासिक उपकरण म्हणजे चोल राजवटीतील वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक आहे. म्हणून मंदिराच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक वारसा असलेले हे घड्याळ परत सुरु करून त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चोल राजवंशातील सम्राट राजा परातंक याच्या शासन काळा दरम्यान तयार करण्यात आलेल्या या भिंतीच्या घड्याळाला बॅटरी किंवा विजेची आवश्यकता नसायची. एका अर्धगोलाप्रमाणे या घड्याळाला आकार दिला गेला आहे आणि ग्रॅनाईटने त्यावर कोरीव काम केले गेले आहे. यामध्ये ३ इंच लांब पितळेची सळी आहे जी क्षितिजाला समांतर रेषेच्या केंद्रामध्ये लावण्यात आली आहे. जशी सूर्याची किरणे घड्याळावर पडतात, तशी लगेच सळीची पडणारी सावली योग्य वेळ दाखवते. मंदिराचे कामकाज सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या सूर्य घड्याळ्याकडे पाहूनच सुरु असते.
जोपर्यंत या घड्याळावर सूर्याची किरणे पडतात, तोपर्यंत हे घड्याळ अचूक वेळ दाखवते. पण पितळेची सळी हळूहळू ग्रॅनाईटच्या पृष्ठभागावर अस्पष्ट दिसू लागली आहे. ब्रिटिशांनी देखील ही ऐतिहासिक वास्तू वापरास सोयीची ठरावी म्हणतु त्यावर इंग्रजी क्रमांक कोरले होते. जे आपल्याला अजूनही पहावयास मिळतात. सध्या या मंदिराला आणि घड्याळालाही नवीन रूप देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या मंदिराबद्द्दल पंचक्रोशीतील भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आहे. या मंदिरात भगवान शिवयोगीनाथर हे आपली पत्नी सौंदर्यायकी सोबतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत. असे म्हणतात की –आठ शिव योगी मुक्ती प्राप्त करून लिंगगम मध्ये विलीन झाले होते. त्यामुळे शंकर देवांचे नाव शिवयोगीनाथर पडले आहे. अशी देखील श्रद्धा आहे की, हे सूर्य घड्याळ भगवान शंकरांच्या प्रभावाने चालते.हे घड्याळ आणि त्याचे तंत्र पाहून, त्या काळातील विद्वानांची स्तुती करावी तेवढी कमी आहे.
____________________________
wꀡ▲㈦ㄅ▲℗℗ 9890875498* ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________
Tags
माहिती