मोबाईलचा नाद तुम्हाला बनवेल मनोरूग्ण

 मोबाईलचा नाद तुम्हाला बनवेल मनोरूग्ण  


दि. 23  मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3sfGl11
समाजातील मोकळेपणा इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे संपला असून समुहाने मनमोकळ्या गप्पा मारणारे लोक मोबाईलमंध्ये डोके खुपसून हाताच्या बोटावर जगाला साद घालू लागले. यादरम्यान आपल्याला मोबाईलचे व्यसन कधी लागले हे कळलेच नाही. मोबाईलमुळे जग जसे गतिमान होत आहे. त्याचप्रमाणे विविध आजारहीलोकांना त्याच गतीने घेरताना दिसत आहे. तरूणांना मुंबईसह अऩेक मोठ्या शहरांमध्ये मानसिक आजाराने विळखा घातला आहे. या आजारामागचे प्रमुख कारण मोबाईलचा अतिवापर हे असल्याचे पूढे येत आहे. या आजारावर उपचार करूण घेण्यासाठी केईएमकडे येत असलेल्या रूग्णांची संख्या पाहाल तर हैराण व्हाल.

मोबाईलचा नाद तुम्हाला बनवेल मनोरूग्ण


याबाबतची माहिती नुकतीच केईएमच्या डीन डॉ. शुभांगी पारकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी या माहितीत म्हटले आहे की, मोबाईल ऍडिक्शनवर उपचार करूण घेण्यासाठी थोडे थोडके नव्हे तरदररोज किमान २५ ते ३० रूग्ण येत असतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,यात सर्वाधिक संख्या ही तरूणाईची आहे. तसेच, यातील सुमारे १० ते १२ जण हे मानसिक आजाराचे बळी असतात. दिवसाला ३० याप्रमाणे गणित केले तर, महिन्याला १३०० तर वर्षाला सुमारे १५६०० रूग्ण हे उपचारासाठी केईएममध्ये येतात. यातील विशेष असे की, मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोकांना कधी ना कधी मोबाईल अॅडिक्शनमुळे मानसिक आजार होण्याची भीती असल्याचेही डॉ. पारकर म्हणतात.स्मार्टफोन वापरणा-या या मंडळींना मानसिक ताण, मणक्याचे विकार, मानेचे विकार, स्वमग्नता, संवाद कौशल्याचा अभाव, एकलकोंडेपणा, नैराश्यासोबतच अचानक वजन वाढणे, यासारख्या गंभीर आजारांची लागण केव्हा झाली हे लक्षातच येत नाही. हे आजार जेव्हा बळावतात किंवा त्रास होण्यास सुरू होतो तेव्हाही मंडळी डॉक्टरांकडे धाव घेतात. या आजारांची लागण झालेल्या मुंलांमध्ये ९ ते २० वयोगटातील मुलामुलींचे प्रमाण मोठे आहे.मुलांच्या हट्टापासून सुटका करून घेण्यासाठी आईवडील अनेकदा मुलांना स्मार्टफोन देतात. अलिकडची पिढी टेक्नॉसॉव्ही असल्यामुळे अल्पावधीतच मोबाईलवर नियंत्रण मिळवतात. ते विविध प्रकारच्या गेम डाऊनलोड करतात अन त्यात तासनतास गढून जातात. अतिगेम खेळने आणि नेट सर्फिंगमुळे पैशांसकट वेळेचाही मोठा अपव्यय होतो. त्यामुळे पालक त्रस्त आहेतच, पण शाळेतील शिक्षकही त्रस्त आहेत.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম