बीड जिल्हा :: होळीनिमित्त जावयाची गाढवावरून काढली जाते मिरवणूक
फेसबुक लिंक http://bit.ly/3lXgmsZ
बीड केज तालुक्यातील विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून वरात काढण्याची अनोखी प्रथा आहे.गावातील तरुणांनी जावई (प्रत्येक वर्षी नविन जावई) यांना रंग लावून गाढवावर बसवले जाते व गावभर डीजेच्या तालावर त्यांची मिरवणूक काढलीजाते.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा हे सर्वसामान्य गावसारखे गाव. बारा वाड्या आणि तेरावे विडा अशी विडा गावाची ओळख. देशभरात रंगांची उत्सव होत असताना, यातील विड्याचा रंग जरा हटके आहे. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची गेल्या ऐंशी वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा या गावाने जपलेली आहे. धिंड काढताना जावयाच्या गळ्यामध्ये खेटरांचा हार घालण्यात येतो आणि त्यानंतर त्याच्यावर रंग आणि पाण्याचा मारा करत गावातून फिरवण्यात येते. सकाळी नऊच्या सुमारास जावयाला गाढवावर बसवले जाते. या वरातीपुढे अख्खा गाव डॉल्बीच्या सुरात नाचतो. या तालावर आबालवृद्ध ठेका धरतात. ही जावयाची वरात गावातील गल्लीबोळातून जाते. घराच्या छतावरून पाणी आणि रंग टाकला जातो.
मिरवणूक संपल्यानंतर जावयाला आंघोळ घालण्यात येते, त्यांना नवीन कपड्यांचा आहेर देण्यात येतो. ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संखेने हजर असतात .
विडा येथील निजाम कालीन ठाकुर कै. आनंदराव देशमुख यांनी थट्टा मस्करीतून धुळवडीला आपल्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली होती. पुढे ही अनोखी प्रथा सर्व गावकऱ्यांनी अखंडपणे सुरू ठेवली. अंगावर रंगाची उधळण करून मिरवून झाल्यावर हनुमान मंदिरावर जावयाला कपड्याचा आहेर चढवून पुन्हा मानसन्मान केला जातो. एकदा मिरवून काढलेल्या जावई बापूंची पुन्हा मिरवणूक काढली जात नाही.
दरवर्षी धुळवडीच्या आधी आठ दिवस या परंपरेसाठी जावई शोध सुरू होतो. धुळवड जवळ येता, गावचे जावई सासरवाडीला यायचे टाळतात.
---------------------------------------------
९८९०८७५४९८
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
-----------------
Tags
नवल