रामगड़ -दुर्लक्षित ऐतिहासिक साक्षीदार

 रामगड़ -दुर्लक्षित ऐतिहासिक साक्षीदार  


तारीख  25 मार्च 2021 

फेसबुक लिंक http://bit.ly/39dKRpg
कणकवली ते आचरे मार्गावर रामगड आहे. तिथल्या गावालाही रामगड हेच नाव असल्यामुळे अनेकांना त्याच्याविषयी माहिती नसल्याचं लक्षात येतं. याउलट रामगडपासून पाच कि. मी. असलेल्या मालडी या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. आदिलशाहीपर्यंत इथे व्यापाराची मोक्याची बाजारपेठ होती. समुद्रमार्गे येणा-या व्यापारी जहाजांना मालवणजवळच्या कोळंब आणि तळाशील या गावांच्या मुखाशी असलेल्या सर्जेकोट येथे नोंद करून पुढे गड नदीमार्गे रेवंडी, तोंडवळी, हडी, कालावल, भगवंतगड मार्गे मालडी, रामगडपर्यंत प्रवास करावा लागत असे. त्यामुळे रामगड हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असावा. रामगडावर जाण्यासाठी रस्त्याजवळूनच पायवाट जाते.गावात प्रथम रवळनाथाचं मंदिर दृष्टीस पडतं. त्याच्याच शेजारील छोटय़ाशा टेकाडय़ांवर मल्लिकार्जुन मंदिर आहे. या मंदिरात गणपतीची सुबक मूर्ती आहे. येथील दुसरं वैशिष्टय़ म्हणजे नंदीची मूर्ती. शंकराच्या मंदिरांमध्ये आढळणा-या नंदीची तोंडे सरळ दिशेत असतात. तर या मंदिरातील नंदीचं तोंड हे उजवीकडे वळलेल्या अवस्थेत आहे.

रामगड़ -दुर्लक्षित ऐतिहासिक साक्षीदार
रवळनाथ
रामगड़ -दुर्लक्षित ऐतिहासिक साक्षीदार

रामगड़ -दुर्लक्षित ऐतिहासिक साक्षीदार

मंदिराच्या पाय-यांजवळ अनेक प्राचीन, देखण्या मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडून आहेत. या पुरातन मूर्तीचं जतन होणं गरजेचं आहे. समोरच शेतातून किल्ल्यावर जाण्यासाठी अरुंद पायवाट आहे.किल्ल्यावर जाण्यासाठी तिथे असलेल्यापाण्याच्या टाकीजवळ दोन फसव्या पायवाटा आहेत. टाकीमागे जाणारी वाट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ जाते, तर दुसरी सरळ वाट जंगलात जाते. किल्ल्यात सभामंडप आणि वाडा भग्नावस्थेत असून त्या समोरच तुळशी वृंदावन मात्र तग धरून उभं आहे. किल्ला एकूण ८ एकर जागेवर असून ७०० यार्ड भरेल एवढी भिंतीची लांबी आहे. तुळशी वृंदावनाच्या समोरच्या जागेत सहा तोफा जमिनीत उलटय़ा रोवून ठेवलेल्या आहेत.

टेहळणीसाठी ठेवलेल्या खिडक्यांमधून गडनदी व दूरवरच्या गावांचं विलोभनीय दर्शन घडतं. प्रमुख प्रवेशद्वार, पहारेक-यांची देवडी अजूनही शाबूत आहे. येथील सर्व भिंतींच्या जोडणीसाठी चुना अथवा तत्सम पदार्थ भरलेला दिसून येत नाही.
 
प्रवेशद्वारावरच्या गोल कमानीकरता वापरलेले भले मोठे दगड एका बाजूने कमी, तर एका बाजूने अधिक अशा पद्धतीने तासूनते एकामेकांत अडकवून बसवले आहेत. किल्ल्यावर १०६ तोफा होत्या अशी नोंद सापडते. किल्ल्याच्या मागच्या दरवाजाने गड नदीकडे जाण्यासाठी वाट आहे. पण जंगली व काटेरी झाडा-झुडुपांमुळे तिथून जाणं अशक्यप्राय आहे. किल्ला जास्त उंचीवर नसल्यामुळे चढताना दमछाक होत नाही.रामगड, मालडी व आजूबाजूच्या कोकण प्रांतावर आदिलशाहीचा अंमल होता.
 मालडी येथे त्या काळी काही भल्या-बु-या घटना घडल्या, त्यांचं अस्तित्व या गावात पाहावयास मिळतं. उदा. सतीची थडगी, सोन्याची तड, मळ्यातली पीर, गाव मुकादम ही स्थळं इतिहास जागता ठेवतात. पण रामगडविषयी काही नोंदी सापडल्या नाहीत.28आदिलशाहीचा अंमल संपल्यानंतर मालवणप्रमाणेच रामगड व मालडी गावांना शिवशाहीत महत्त्व प्राप्त झालं होतं. परकीय शक्तींसोबत लढायचं, तर आपलं सागरी आरमार प्रबळ असायलाच हवं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी डच, पोर्तुगीज, इंग्रजांचं आक्रमण थोपवण्यासाठी व स्वराज्य बळकट करण्यासाठी आरमाराची स्थापना केली. अरबी समुद्रामार्गे गडनदीतून व्यापारी जहाजांची वाहतूक सुरू असे. त्यांच्यावर अंमल ठेवण्यासाठी व पूर्वेकडील मार्गावर संरक्षण करण्यासाठी रामगडातून नजर ठेवली जात असे. सिंधुदुर्गात एकाच नदीच्या मार्गावर चार गड पाहावयास मिळणं, म्हणजे दुर्लभ आहे. पश्चिमेकडच्या समुद्रमार्गावरील कोळंब व तळाशील गावाच्या मुखाशी सर्जेकोट उभा ठाकलेला आहे. नदीच्या दक्षिण दिशेस मसुरे गावाजवळ भरतगड तर उत्तरेला भगवंतगड आणि पूर्वेला रामगड, यावरून अनुमान काढता येईल की, या परिसरातून किती मोठय़ा प्रमाणात व्यापार व्यवहार होत असत.आठ फेब्रुवारी १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रामगड व मालडी बंदरातून ८५ मध्यम व ३ भव्य आरमारी जहाजांसह गडनदीतून मार्गक्रमण करत बेंदनूर (द. कर्नाटक) तालुक्यातल्या बसरूर बंदरावर स्वारी केली होती. शिवाजी महाराजांच्या सात गुरूंपैकी एका मौनी महाराजांनी दक्षिणेतील या युद्धात विजय मिळवण्यासाठी कानमंत्र दिला होता. त्याचं पालन करत शिवाजी महाराजांनी यश प्राप्त केलं. मौनी महाराजांचं मंदिर मालवण येथील मेढा या भागात आहे. असा हा अनेक घटनांचा साक्षीदार असलेला रामगड इतिहासातील एक एक कुपी उलगडून दाखवत असतो. मात्र हाकिल्ला पाहण्यासाठी पाऊस कमी झाल्यावर जावं. किल्ल्यावरच्या परिसरातून दिसणारे तरारलेले शेतमळे, कुणगे, छोटी-छोटी टुमदार गावं, खळाळत वाहणारी गडनदी, हिरवाईनं नटलेला परिसर पाहून मन प्रफुल्लीत होईल. गडापर्यंत पोहोचण्यासाठी कणकवली, देवगड, आचरा येथून वाहतुकीची सोय आहे.
___________________________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖
___________________________
✆ 9890875498
___________________________
फेसबुक ५ मार्च २०१६

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম