फेसबुक लिंक http://bit.ly/3cveGCs
❏ आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असेल की दहशतवादामध्ये केवळ पुरुषांचा सहभाग असतो तर तुमचा हा समज पूर्णत चुकीचा आहे. कारण जगातील सर्वच दहशतवादी संघटनांमध्ये महिला देखील तितक्याच सक्रीय आहेत जेवढे की पुरुष सक्रीय आहेत.👩🎤🔫
जाणून घेऊया त्यापैकी चार मोस्ट वॉन्टेड महिला दहशतवाद्यांबद्दल! जाणून घेऊया त्यापैकी चार मोस्ट वॉन्टेड महिला दहशतवाद्यांबद्दल!
🔫👩🎤हसना अत बोलाचेन
फ्रान्समधील पॅरिस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली हसना ही युरोपमधील पहिला महिला दहशतवादी असल्याचेही म्हटलं जात आहे. पॅरिसहल्ल्याच्या तपासादरम्यान, जेव्हा पोलिसांनी एका अपार्टमेंटमध्या छापा टाकला, त्यावेळी तिथे हसना हजर होती. मात्र, तिने पोलिसांना शरण जाण्याऐवजी स्वत:लाच बंदुकीनं उडवलं.हसनाने स्वत:ला गोळी मारल्याच्या वृत्ताचं फ्रान्स पोलिसांनी खंडण केलं आहे. हसनाचं लहनापण प्रचंड वेदनादायी होतं. मात्र, तिला ओळखणाऱ्या कुणालाही असं वाटत नव्हतं की, हसना दहशतावाद किंवा कट्टरतावादकडे झुकेल. हसनाच्या भावाच्या म्हणण्यानुसार, तिने कधीच कुराण उघडून पाहिलं नाही. मात्र, ती नेहमी फेसबुक आणि व्हॉट्सअप बघायची.
👩🎤🔫असाता शकुर
क्युबामध्ये राहणारी असाता ही अनेक दहशतवादी कार्यांमध्ये सक्रीय आहे. १९७१ ते १९७३ या तीन वर्षांच्या कालावधीत असाता अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचंसमोर आलं आहे. १९७९ मध्ये एका बँक दरोडा आणि एका पोलिसाची हत्या या गुन्ह्यांमध्ये असाता शिक्षा भोगत असताना अमेरिकेतून क्युबामध्ये पळून आली. गेल्या ३० वर्षांपासून असातावर मोठ-मोठे बक्षीस जाहीर झाले आहेत.
🔫👩🎤समांथा ल्यूथवेट
व्हाईट विडो या नावाने ओळखली जाणारी ब्रिटनची नागरिक समांथाला अनेक देशांचे पोलीस शोधत आहेत. समांथा प्रचंड खतरनाक महिला दहशतवादी म्हणून ओळखली जाते. ७ जुलै २००५ मधील लंडनमधील एका सार्वजनिक बसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात समांथासह तिचा पती जर्मेन लिंडेसचाही सहभाग होता.२०१३ साली नायोरबीमधील शॉपिंग मॉलमधील हल्ल्यामागेही समांथाचाहात होता, असे म्हटले जात आहे. या हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. महिलांना सुसाईड बॉम्बरची ट्रेनिंग देण्याचा आरोपही समांथावर आहे.
🔫👩🎤तशफीन मलिक🔵
३१ वर्षीय तशफीन मलिक हिने तिचा पती सय्यद फारुख याच्यासोबतीने कॅलिफोर्नियातील एका कुटुंब नियोजन केंद्रावर गोळीबार करुन १४ लोकांची हत्या केली. असे म्हटलं जातं की, तशफीन ही कॉलेजमध्ये सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखी जायची. मात्र, याची कुठेही माहिती मिळत नाही, की तशफीन कट्टरतावादाकडे कशी आणि केव्हा झुकली. तशफीन आणि फारुख या दहशतवादी दाम्पत्याला एक सहा महिन्यांची मुलगी आहे, या मुलीला त्यांनी फारुखच्या आईकडे सोडलं आहे.दहशतवादाचं विश्लेषण करणाऱ्या काही जाणकारांनी असे सांगितलं आहे की, मुल जन्माला घालणं हे या दहशतवादी दाम्पत्याची रणनिती असण्याची शक्यता आहे. मुल आहे म्हणजे तशफीन आणि फारुख हे सर्वसामान्य दाम्पत्य आहे, असा समज निर्माण व्हावा यासाठी या दोघांनी मुल जन्माला घातलं असावं,असाही जाणकारांचे म्हणणे आहे.
------------------------------------------
९८९०८७५४९८❗
_*✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*_
❗-----------------
🌿🌷🍃