नवीन रेडिमेड शर्ट सोबत जास्तीचे बटन आणि कापड का दिले जाते?
दि. एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3sSE38a
जर आपण बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या वेळी रेडिमेड शर्ट खरेदी करतो त्यावेळी त्या शर्टबरोबर आतील बाजुस एक एक्स्ट्रा बटण लावलेले असते,काही कंपन्या तर बटण व छोटासा कापडी पीस पण बरोबर देतात.आपण नवीन शर्ट, पॅण्ट, टॉप किंवा कुठला कुर्ता विकत घेतो तेव्हा त्यासोबत त्याच कपड्याचा एक एक्स्ट्रा छोटासा पीस आणि एक किंवा दोन बटन असतात. जर तुम्ही विचार करत असाल की हे एक्स्ट्रा कपडा कधी वेळ आली तर रफ्फू वगैरे करण्यासाठी वापरले जावे म्हणून दिले जाते, तर असं नाहीये. ह्यामागे काही वेगळंच कारण असतं.![]() |
तर नवीन कपड्यांसोबत येणारे हे एक्स्ट्रा कापड ह्यासाठी दिले जाते की, तुम्ही त्याला धुवून हे महिती करू शकाल की, तुम्ही घेतलेले कपडे कुठल्या प्रकारचे आहेत. म्हणजेच धुतल्यावर त्याचा रंग जातो का, कपड्याला ब्लीच ची गरज आहे का?
म्हणजेच कपड्यांसोबत मिळणाऱ्या ह्या एक्स्ट्रा कपड्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या कपड्यांना लवकर खराब होण्यापासून वाचवू शकता.तसेच कपड्यांसोबत मिळणाऱ्या एक्स्ट्रा बटनचा वापर तर सर्वांनाच माहित आहे. जर शर्ट किंवा कुर्त्याचे बटन तुटले तर त्याजागी आपण हे एक्स्ट्रा बटन वापरू शकतो.कारण त्याच रंगाचे तसलेच दुसरे बटण बाजारात मिळेलच असे नाही.
___________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ™ 🏉
______________________________
Tags
जनरल नॉलेज

