गुजरातमधील रहस्यमय झुलणारी 🕌 मशीद.
दि. २६ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2Pppef2
गुजरात राज्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकीच एक रहस्यमय इमारत जी अनेक मोठ्या वास्तू तज्ज्ञांसाठी न उलगडलेलं कोडं आहे. ती इमारत म्हणजे 'सीदी बशीर मशीद'. या मशिदीत असलेले एक मिनार हलवल्यास दुसरे मिनारही आपोपापच हलायला लागते. यामुळेच या मशिदीचे नाव झुलता मिनार ठेवण्यात आले आहे. 🕌 मशिदीचा इतिहास 🕌
सीदी बशीर मशिदीचे बांधकाम १४६१ ते१४६४ दरम्यान सारंगने सारंगपूर येथे केले होते. मशिदीच्या बांधकामाची सर्व सुत्रे सीदी बशीर यांच्याकडे होती. त्यांच्या मृत्यूनंतर याच मशिदीजवळ त्यांना दफन करण्यात आले. त्यावरुन या मशिदीचे नाव सीदी बशीर मशीद असे पडले.🕌 काय आहे रहस्य? 🕌
ही झुलणारी मिनार नकळत तशाप्रकारे बनली गेली आहे. ज्या दगडांचा वापर करुन ही मशीद उभारण्यात आली, ते वेगळ्या प्रकारचे दगड होते, असे मत संशोधकांनी मांडले आहे.दुसऱ्या एका शोधात असे सांगितले गेले आहे, की ज्या दगडांनी या मशिदीचे निर्माण केले, त्यात फेलस्पारची मात्रा अधिक होती. अनेकवर्षांच्या रासायनिक अभिक्रियेनंतर दगडांवर हा परिणाम झाला आहे. फेलस्पार या पदार्थाचे हळू हळू अॅसिडमध्ये रुपांतर होते. परिणामी, हा दगड लवचीक होऊन दगडांमध्ये मोकळी जागा निर्माण होते. या दगडांना मिनार बलुआ असे म्हणतात. या दगडांमध्येच अशा प्रकारचे गुण असल्याचे संशोधक सांगतात.आता यात नेमकं खरे काय आणि खोटे काय, ते सांगता येणार नाही.▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🥇
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Tags
नवल
