संशोधकांनी बनवले चक्क गायब होणारे कापड!

संशोधकांनी बनवले चक्क गायब होणारे कापड ! 


दि. ३ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3dyBMIS
लंडन :ऑक्टोपससारखा दिसणारा एक सागरी जलचर म्हणजे ‘स्न्वीड’. त्याच्या गुण-स्वभावापासून प्रेरित होऊन संशोधकांनी आता एक असे कापड बनवले आहे जे चक्क गायबही होते म्हणजे कुणाला दिसत नाही. शिवाय हे कापड आपल्यापासून परावर्तीत होणार्या तापमानाच्या पद्धतीतही बदल करू शकते

संशोधकांनी बनवले चक्क गायब होणारे कापड!

 
ज्या उपकरणाच्या सहाय्याने रात्रीसुक्ष्म वस्तूंना पाहिले जाते, त्याच्या सहाय्यानेही या पोषाखाला पाहता येत नाही. हे विशिष्ट कापड खेचल्यावर किंवा त्यामधून वीज सुरू केल्यावर एका सेकंदामध्येच त्याचा पृष्ठभाग अतिशय वेगाने सपाट बनतो. त्यामुळे इन्फ्रारेड उपकरणांच्या सहाय्यानेही त्याला पाहता येऊ शकत नाही. शिवाय हे कापड आपल्या तापमानातही हवे तसे बदल करू शकते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील एलन गोरोडेट्स्की यांनी याबाबतचीमाहिती दिली. ते म्हणाले, आम्ही अशा कापडाची निर्मिती केली आहे जे स्न्वीडच्या त्वचेसारखेच तापमानाला प्रतिबिंबित करू शकते. सैन्यासाठी अशा कापडाचे पोषाख सहायक ठरू शकतात. तसेच अंतराळयानांसाठी चांगले इन्सुलेशन उपलब्ध करणे, हिटिंग-कुलिंग सिस्टिम, आपत्तीच्या काळातही हे कापड उपयुक्त ठरू शकते. विज्ञान कल्पना आणि विज्ञान वास्तव यांचा मेळ घालून हे तंत्र विकसित करण्यात आले आहे.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ™ 🏉
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম