कनकादित्य मंदिर, कशेळी

कनकादित्य मंदिर, कशेळी  


दि. १० मे २०२१

फेसबुक लिंक  http://bit.ly/3vUxXW0
कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस ४० किलोमीटर ,पावस पासून दक्षिणेस २४ किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर कशेळी गाव वसले आहे.भारतात असणाऱ्या मोजक्याच सूर्यमंदिरांपैकी कोकणातले हे एकमेव मंदिर. कनकादित्य मंदिराला उज्वल ऐतिहासिक परंपरा आहे. मंदिरातील श्री आदित्याची मूर्ती सुमारे १ हजार वर्षांपूर्वी सोमनाथ नजीकच्या प्रभासपट्टण (भगवान श्रीकृष्णांचे वसतीस्थान) क्षेत्रातील सूर्यमंदिरातून कशी आणली गेली याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. पण कशेळी गावात राहणाऱ्या कनकाबाई या सुर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिने गावकऱ्यांच्या सहकार्याने गुहेत सापडलेल्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली हि कथा प्रचलित आहे, कनकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असे संबोधले जाऊ लागले. ज्या गुहेत हि काळ्या पाषाणातील मूर्ती सापडली गेली तिला आजही 'देवाची खोली' म्हणून ओळखले जाते.              

मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच अनेक तुळसी वृंदावन आहेत. प्रशस्त अश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंदिराचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. चारही बाजूंनी भक्कम चिरेबंदी, जांभ्या दगडात सजलेलया परिसरातील इतर देव देवतांची मंदिरे आणि सभामंडपात सागाच्या लाकडात केलेले सुंदर कोरीव पाहत आपण समोरच असणाऱ्या जुन्या बांधणीच्या विहिरीकडे पोहचतो.मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहरीवर हात-पाय धुवून आत जाण्याची प्रथा आहे. या विहरीवर पाणी काढण्याची जुनी कोकणी पद्धत पहायला मिळते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पन्हाळगडचा शिलाहार राजा आषाढ शुद्ध ४ शके १११३ रोजी संक्रांतीच्या पर्वकाळी समुद्रस्नानाला कशेळीला आला असता कशेळी गावात दररोज ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येणार्‍या खर्चासाठी त्याने कशेळीच्या गोविंद भट-भागवताना हा गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट कनकादित्य मंदिरात आहे. गोविंद भट कनकादित्याचे पुजारी होते. आज सुद्धा गोविंद भटांचे भागवत कुलोत्पन्न वंशज विश्वस्त आहेत. छत्रपती शिवरायांनी १६६१ मध्ये दक्षिण स्वारीच्या वेळेला कशेळी गावाला भेट दिल्याचा संदर्भ आढळतो.


कनकादित्य मंदिर, कशेळी


कनकादित्य मंदिराच्या सभामंडपाचे काम मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ ह्यांनी केल्याचा उल्लेख आढळतो.
दरवर्षी रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस साजरा होणार्या या उत्सवाच्या काळात आडिवरे येथून कालिकादेवीला वाजत गाजत गावात आणून देविचा मुखवटा श्री कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी रथ सप्तमीला विधिपूर्वक पूजा होईन उत्सवाला सुरुवात होते. कालिका देवी बरोबर आडिवऱ्याची भगवती देवी पाठराखीण म्हणून चार दिवस कशेळीला मुक्कामाला येते. उत्सवाच्या काळात किर्तन, प्रवचन आरती, पालखी याचे आयोजन केले जाते.


मंदिराचे आणखि एक वैशिष्ट्य म्हणजे कनकादित्य मंदिराच्या छतावर ज्या विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत त्यात अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखे आहेत. अग्निनारायण म्हणजे अग्नी. घरातील अग्नीचे स्थान म्हणजे स्वयंपाकघरातील चूल. चूल मांडायची ती तीन दगडांवर म्हणजे पायावर म्हणून तीन पाय. चुलीची अग्निमूखे दोन एक चुलीचे दुसरे वेलाचे म्हणून दोन मुखे. आणि दोन्ही मुखांवर भांडे ठेवण्यासाठी जे छोटे छोटे खूर (उंचवटे) असतात. त्यांमध्ये वैलाचे चार व चुलीचे तीन असे मिळून सात म्हणून सात हात आहेत. संपूर्ण चुलीची जी रचना व तिचे प्रतीकात्मक रूप या अग्निनारायणाच्या मूर्तीत सामावले आहे.
मंदिर पाहताना खुप समाधान मिळते.
राजापुर हे जवळचे राहण्यासाठी योग्य आहे. 
संपर्क : 
निवास व्यवस्था राजापुर येथे संपर्क करावा

निवास व न्याहरी

Smt.Vishwas Ganpat Karagutkar,
287, At/Post Ambolgad,Tal-Rajapur,
Dist-Ratnagiri-415806
Ph-9221633699,9221812528
vishwasgkargutkar@gmail.com
_____
Shri. Arvind Tryambak Sakhalkar,
"Davbindu" At.Post.Oni, Tal.-Rajapur, Dist.-Ratnagiri.-416705.
Ph. No. 8698081316
davbindunh17@gmail.com
______
Shri.Santosh Ganesh Khandekar
331, At-Post-Mogare, Tal-Rajapur, Dist-Ratnagiri
Ph-No-9882013847/9881737462/9822063347
lakeresort707@gmail.com
________
Shri.Subhashchandra Sarjerao
Shinde Desai
At-Post-Oni, Tal.Rajapur,
Dist-Ratnagiri
PH.No.8806254442/8806224442
_______
Smt.Vishranti Vishwas Kargutkar
H.No.336, Shantadurga, Sundarwadi Samudra Kinara,
At-Post-Ambolgad, Tal.Rajapur, Dist-Ratnagiri
Ph.No.9221633699/9967330551
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম