आई आणि मुलीचा पती एकच; चक्रावून टाकणारी लग्नाची विचित्र प्रथा
फेसबुक लिंक http://bit.ly/3eVT4AA
आई आणि मुलीचा पती एकच असल्याची लग्नाची विचित्र प्रथा बांगलादेशातल्या मंडी समाजामध्ये पहायला मिळते.ही प्रथा सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारी आहे. या समाजातल्या प्रथेनुसार मुलीचा तिच्याच वडिलांबरोबर विवाह होतो.माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,बांगलादेशातील दक्षिण-पूर्वेकडच्या माधोपूर जगंलात ही जमात वास्तव्यास आहे. या समाजात बालवयातच मुलीचे लग्न लावून दिले जाते. त्यांच्यात अजूनही मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था असून, महिला या घराच्या कारभारी असतात.विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगातही त्याची जोपासना ते करत आहेत.मंडी समाजामध्ये विधवा महिलेचा पतीच्याच कुटुंबातील तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषाबरोबर पुनर्विवाह लावून दिला जातो. या समाजात विधवेला पुनर्विवाह करताना आपली एक मुलगी दुसरी पत्नी म्हणून दुसऱ्या पतीला द्यावी लागते. वयात आल्यानंतर या मुली बरोबर पतीचे शरीरसंबंध सुरु होतात.आता ही प्रथा बंद करणेसाठी या जमातील महिलांनी 'अचिक-मचिक' नावाची एक संघटना स्थापन केली आहे.त्यांचा या परंपरेला विरोध असून, अनेक मुली आपल्या वडिलांसोबत लग्न करण्यास नकार देत आहेत.या जमातील 90 टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे.संपत्तीचे वाटे होऊ नयेत, यासाठी या जमातीत ही पंरपरा असल्याचे या संघटचे म्हणणे आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
Tags
नवल