फेरफटका कुशिरे जोतीबाचा

 फेरफटका कुशिरे जोतीबाचा 


दि. ३ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3xKWUVU
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवीरपीठास धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. यातीलच धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व ऐतिहासिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्राचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.

फेरफटका कुशिरे जोतीबाचा

पायी जाण्यासाठी इतिहास कालीन मार्ग आहे तो निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कुशिरे गावातून. कोल्हापूरकर मॉर्निंग वॉकिंगसाठी कुशिरे फाटा ते जोतिबा हा मार्ग दर रविवारी आवर्जून निवडतात. इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी साधारणतः या मार्गाने १००० ते १५०० भाविक जोतीबाच्या दर्शनाला जातात. जोतीबा यात्रेचा मुख्य दिवस आणि पाच खेट्याच्या काळात साधारणतः पाच हजारहुन अधिक भाविक या मार्गावरून जोतिबाच दर्शन घेतात. पाकाळणीच्या उत्सवाला सुद्धा हा आकडा दोन हजारांच्या वरती असतो.              
 🔹मार्ग 🔹
कुशिरे गावांपर्यंत बरेच लोक चारचाकी किंवा दुचाकीवरुन पोहचतात.  आपली गाडी पार्क केल्यानंतर जोतिबा डोंगराच्या दिशेने पायी प्रवास सुरु होतो. काहीजण शिवाजी पूलापासूनच चालायला सुरवात करतात. आजूबाजूला असणारी झाडी , पक्ष्याची किलबिल , मोरांचे आवाज यामुळे प्रवासातील थकवा दूर होऊन आनंद आणखी दुणावतो. वाटेमध्ये येणारे चढ उतार आपल्या शारीरिक क्षमतेची कसोटी घेत राहतात. तर वाटेत लागणारी छोटीछोटी मंदिरे इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असल्याचा भास करून देतात., वाटेमध्ये असणार्या  करवंदाच्या जाळ्या आणि कैरीच आस्वाद घेत लोक प्रवास करतानाही पाहायला मिळते.कुशिऱ्यातून जवळपास सहा कि.मी.अंतरावर असलेल्या प्रवेशद्वार कमानीपाशी क्षणभर विश्रांती घेवून अनेकजण पुढचा प्रवास निश्चित करतात. इथून दरीमध्ये  दिसणार वाहत्या नदीच पाणी आणि फोर्ट स्कूलच नयनरम्यदृश्य पाहिले की आलेला सगळा थकवा नाहीसा होतो. जोतिबाच्या नावाचा गजर करत पुन्हा थकलेली पावलं जोमाने मंदिराकडे जायला वळतात.
मुख्य मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूला लागणारी प्रसादांची, हारांची दुकाने नकळत आपल लक्ष वेधून घेतात. कळसाच दर्शन घेतल्यानंतर गुलालात  न्हाऊन निघत आपण मुख्य मूर्तीच दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करतो.  साधारणत तासभरामध्ये आपण डोंगर उतरतो आणि कुशिरे गावात पोहचतो.  परतीच्या प्रवासामध्ये  तिथे आपले  स्वागत होते ते ताज्या भाज्या विकत असलेल्या गावकरी स्त्रियांकडून. प्रत्येकांनीएकदा तरी अनुभवायला हवा असाच कुशिरे ते जोतिबाचा अविस्मरणीय प्रवास आहे. भक्ती मार्गाबरोबर स्वत:ची आरोग्यावृधी असा दुहेरी हेतू यात सहज साध्य होतो.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম