हे आहेत जगातील प्रसिद्ध सात खजिने !
. {दि. २६ मे २०२१}
फेसबुक लिंक http://bit.ly/3yGFIB0
जगात अनेक गुपिते दडलेली आहेत. काही गुपिते ही गुपितेच राहिली तर काही उघड झाली.पुर्वी अनेक शासकांनी आपले खजिने दडवुन ठेवले आहेत.काहींचा माग काढता आला तर काहींचा अजुनही शोध सुरू आहे.अशाच सात चर्चित खजिन्यांबाबतची ही माहिती पाहुया. ▪कारुनचा खजिना ▪
इसवी सन पूर्व 560 या काळातील पश्चिम तुर्कीमधील लीडिया या राज्यात कारुन (क्रोशस) नावाचा राजा होता. त्याला संपत्ती गोळा करण्याचे वेड होते आणि तो अतिशय घमेंडखोरही होता. काही कारणाने त्याचा खजिना तुर्कीच्या उसाक प्रांतात कुठे तरी जमीनदोस्त झाला. तो शापित असल्याचे मानलेजाते. तो शोधण्याचा प्रयत्न करणार्याचा एक तर मृत्यू होतो किंवा त्याचे मोठे नुकसान होते, असे म्हटले जाते.▪फॉरेस्ट फेनचा खजिना ▪
फॉरेस्ट फेन हा अमेरिकेच्या हवाई दलातील एक पायलट होता. तो मौल्यवान कलाकृतींचा व्यापारही करीत असे. 1980 मध्ये त्याला मूत्रपिंडाचा कर्करोग झाला. त्यानंतर त्याने आपल्याजवळील अब्जावधीरुपये किमतीच्या सोन्याच्या कलाकृती, दागदागिने लपवून ठेवण्याचे ठरवले. हा खजिना कुणालाही सापडणार नाही, याची त्याने मृत्युपूर्वी काळजी घेतली होती. हा खजिना शोधणार्यांसाठी त्याने काही संकेतही दिले होते. मात्र, त्याचा खजिना शोधण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत चार लोकांचा बळी गेला आहे.▪द अंबर रूम ▪
रशियात सेंट पीटर्सबर्गच्या एका महालात ही अंबर रूम आहे. सोन्यापासून बनवलेली ही खोली असून पर्शिया (इराण) मध्ये 1707 मध्ये तिची निर्मिती झाली होती. रशियाच्या ‘पीटर द ग्रेट’ आणि पर्शियातील शांती करारानंतर पीटरला ही सोन्याची खोली भेट म्हणून मिळाली होती.,दुसर्या महायुद्धावेळी 1941 मध्ये जर्मनीच्या नाझी सैन्याने त्यावर कब्जा केला आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या भागात विभाजन केले. हे सर्व तुकडे 1943 मध्ये एका म्युझियममध्ये ठेवण्यात आले होते. तेथून ही संपूर्ण ‘अंबर रूम’ गायब झाली, जिचा आजही शोध लागलेला नाही!▪जेन लॅफिटचा खजिना ▪
▪ओक आयलंड ▪
1975 मध्ये ओक आयलंडवर काही मुलांनी नोवा स्कोटियाजवळ एक रहस्यमय प्रकाश पाहिला. तिथे त्यांना एक मोठा खड्डा दिसला. या खड्ड्यात त्याने आणखी खोदकाम केल्यावर आत नारळाच्या करवंट्या, लाकूड आणि एका विशिष्ट दगडाचा तुकडा सापडला. या तुकड्यावर लिहिले होते की, आत 40 फूट खोलीवर 2 दशलक्ष पौंडाचा खजिना आहे. त्यानंतर अनेकांनी तिथे खोदकाम केले; पण खजिना काही सापडला नाही. या खोदकाम करणार्यांमध्ये पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले फ्रँकलिन रुझवेल्टही होते हे विशेष!▪गोल्डन आऊल ▪
1993 मध्ये फ्रान्सच्या मॅक्सव्हॅलेंटाईन नावाने प्रसिद्धअसलेल्या एका व्यक्तीने लोकांना सांगितले की, फ्रान्समध्ये कुठे तरी एक गोल्डन आऊल (सोन्याचे घुबड) आहे. जो कुणी ते शोधून काढेल त्याला 10 लाख फ्रँक्स मिळतील.हे घुबड शोधण्यासाठी त्याने 11 संकेतही दिले होते. अनेक लोकांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला; पण यश मिळाले नाही. 2009 मध्ये व्हॅलेंटाईन याचा एका कार अपघातात मृत्यू झाला. आजही लोक हे घुबड शोधत आहेत!▪ चंगेज खानाचा खजिना ▪
यानेच मंगोल साम्राज्याची स्थापना केली होती. त्याने जगभर अनेक युद्धे करून बरीच लूट जमा केली होती. सन 1227 मध्ये त्याचा मृत्यू झाला. एकाअज्ञात ठिकाणी त्याला मोठ्या खजिन्यासह दफन करण्यात आले. आजही त्याचे दफनस्थळ नेमके कुठे आहे हे कुणालाही माहिती नाही. शिवाय त्याचे दफनस्थळ व खजिन्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.तरीही लोक या खजिनयाच्या शोधात आपला जीव पणाला लावत आहेत.●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _ጦඹիiᎢi
Tags
माहिती