तुर्कमेनिस्तान :या देशातील नागरिकांना सरकार पाणी, गॅस आणि वीज अगदी मोफत पुरवते !
. {दि. २६ मे २०२१}
फेसबुक लिंक http://bit.ly/3oQC9DR
तुर्कमेनिस्तान या देशातील लोक सुखी म्हटले पाहिजेत.पाणी, नैसर्गिक गॅस आणि वीज या तीन गोष्टी सरकार नागरिकांना मोफत देते. तुर्कमेनिस्तानहे जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त नैसर्गिक गॅसचे साठे असलेला देश आहे. तसेच या देशातील बहुतांश प्रदेश हा कराकुमच्या वाळवंटाने आच्छादलेला आहे. या देशाचे सरकार १९९३ पासून देशातील नागरिकांना मोफत पाणी, वीज आणि नैसर्गिक गॅस प्रदान करत आहे. तुर्कमेनिस्तान मधील नागरिक बाहेर जाताना सुद्धा घरातील दिवे घालवत नाहीत, कारण बल्ब बंद केल्यानंतर परत चालू केल्यावर पूर्ण प्रकाशित होईपर्यंत सुमारे पाच ते दहा मिनटे लागतात. तसेही येथील नागरिकांना वीज मोफत मिळत असल्याने दिवे चालू ठेवून बाहेर जाण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही. तुर्कमेनिस्तान सरकारने अजून २०३० पर्यंत नागरिकांना पाणी,वीज आणि नैसर्गिक गॅस मोफत देण्याचे वचन दिले आहे.मुळात कमी लोकसंख्येचा देश इतका संपन्न आहे की येथील सरकारवर या गोष्टीचा ताण येत नाही.
______________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
💤 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव, जि. कोल्हापूर 💤
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _ጦඹիiᎢi
Tags
माहिती