किल्ले महादेवगड
फेसबुक लिंक http://bit.ly/2Q0JB2u
आंबोली कोणाला माहित नाही.? प्रत्येक पर्यटक प्रेमीला पावसाळ्यात आंबोली खुणावत असते.तर इतिहास प्रेमीना किल्लयासाठी खुणावत असते, निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात. आंबोलीत किल्ला आहे हे येथे येणारया बरयाच पर्यटकांना माहिती नाही.
या आंबोलीत अनेक पहाण्याची ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे "महादेवगड" पॉंईंट. आंबोली गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्या पर्यंत डांबरी रस्ता आहे. किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी पारपोली घाटवर लक्ष ठेवण्यासाठी महादेवगड हा किल्ला बांधण्यात आला.
किल्लयाचा इतिहास
महादेवगड सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड(दुसरे) सावंतांनी बांधला.1730च्या सुमारास कोल्हापुरकरांनी सावंतवाडीवर दुसरा हल्ला केला. यात कोल्हापुरच्यावतीने सरदार उदाजीराव मोहिते हे नेतृत्व करत होते; मात्र सावंतवाडीकरांच्या चोख प्रतित्युत्तरामुळे त्यांना परतावे लागले. हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांना पोर्तुगिजांशीही दोन हात करावे लागले.त्यांच्या कारकिर्दीत सावंतवाडी संस्थानात काही नवे किल्ले बांधण्यात आले. यात फुकेरी येथील हनुमंतगड, गेळे येथील नारायणगड, आंबोली येथील महादेवगड, सोनवडे येथील नरसिंहगड किंवा सोनगड, मसुरे येथील भरतगड, ओवळीये तर्फे मालंड येथील सिदगड, आवाडे येथील आवर किल्ला आणि हळर्ण (गोवा) येथील कोट याची उभारणी केली. शिवाय कुडाळ, बांदा, डिचोली, साखळी, वेंगुर्ले येथील जुन्या कोटांची डागडूजी केली. महादेवगड किल्याला एकेकाळी किल्ल्याला तटबंदी, बुरुज होते. तटबंदी भोवती खंदक होता, पण आज यापैकी काहीही अस्तित्वात नाही.किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.फोंड सावंत दुसरे यांनी आंबोलीत नारायणगड आणि महादेवगड असे दोन वनदुर्ग बांधले. महादेवगड पारपोली घाटीच्या शिखरावर होता. गेळेच्या हद्दीत नारायणगड होता. महादेवगडावर पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. ब्रिटीशांनी तो उद्ध्वस्त केला. नारायणगड हा मोठा किल्ला नव्हता. कोकणातून घाट चढून वर आल्यावर जकातीचे मेट याच किल्ल्याच्या ठिकाणी होते..गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड दिसतात.आज महादेवगडावर काही शिल्लक नाही.नाही म्हणायला एक पॉंईट गडाच्या नावाने आपले अस्तित्व दाखवत ऊभा आहे. पर्यटक येतात दंगामस्ती करतात.व निघुन जातात. कधीकाळचा बलाढ्य महादेवगड हे मुकपणे पहात ऊभा आहे.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
©माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव