इंडोनेशिया- हिंदू संस्कृती मिरवणारा,मुस्लिम देश
सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदू तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर व प्रंबनन ही धार्मिक शहरे वसवली. मजापहित हे हिंदू राजघराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळूहळू जम बसवत त्यांनी सुमात्रा बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरुवात झाली. सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.
भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या सन्मानार्थ येथे बांधण्यात बांधण्यात आलेली मंदिरे आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. यांच्या भाषेमध्ये संस्कृतमधील शब्द आपल्याला पाहायला मिळतात आणि महाभारत आणि रामायण यांच्यामध्ये आलेल्या नावांची दुकाने आपल्याला याच्या शहरांमध्ये पाहायला मिळतात.पण *आजही इंडोनेशियामध्ये २ टक्क्यांपेक्षा कमी हिंदू लोकसंख्या आहे.*
इंडोनेशिया हे देश अधिकृतपणे सहा धर्मांसाठी ओळखला जातो. त्यातीलच एक हिंदू धर्म हा आहे. ही यादी १९६२ मध्ये बनवली गेली होती आणि यांचे बहुतांश अनुयायी हे बाली, जावा आणि लोम्बोक येथे स्थित आहेत. १९६४ पासून ‘द परिषदा हिंदू धर्म, इंडोनेशिया’ ही एक धार्मिक संघटना असून ते हिंदू प्रथा कायम राखण्यासाठी आणि इतरत्र हिंदूंबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहेत.
बाली हे हिंदू इंडोनेशियाचे केंद्रबिंदू आहे, तर जावामध्ये अनेक हिंदू आणि बौद्ध धर्माची मंदिरे आहेत. ज्यामध्ये बोरोबुदूर या जगातील सर्वात मोठ्या बौद्ध मंदिराचा समावेश आहे. या ठिकाणी देखील काही हिंदू धर्मातील नियम पाळले जातात, पवित्र महिन्यामध्ये येथे उपवास केले जातात आणि प्रार्थना देखील केली जाते.“येथील एका स्थानिक संग्रहालयाजवळील एकावर्क स्टेशनमध्ये राम, शिंता (सीता) आणि गोटोकाका (घटोत्कच) यांचे म्हशीच्या कातड्या पासूचन तयार केलेले पुतळे आहेत.
इंडोनेशियामध्ये तुम्हाला खूप अशी नावे ऐकायला मिळतील, जी ऐकण्यासाठी खूप विचित्र असतील. श्री मुल्यानी इंद्रावती ही इंडोनेशियाची अर्थमंत्री आणि जागतिक बँकेची माजी संचालक होती. त्याचबरोबर जनरल गटोट नूरमान्त्यो (घटोत्कच) आर्मी फोर्सचे माजी कमांडर.या इतिहासामुळेच आज इंडोनेशियामध्ये आपल्याला हिंदूंचा प्रभाव असलेली माणसे मिळतात आणि त्यांची नावे देखील हिंदू धर्माशी निगडित असतात.
जलेषु भूम्याम् च जयामहे -इंडोनेशियन मरीन कोअर
जलेष्वेव जयामहे -इंडोनेशियन नौदल
त्रिसंन्ध्या-युद्ध -इंडोनेशियन पायदळ
द्वि-शक्ति-भक्ति -इंडोनेशियन इक्विपमेन्ट कोअर
धर्म-विचक्षण-क्षत्रिय -इंडोनेशियन पोलीस प्रबोधिनी (इथे धर्म म्हणजे रिलिजन नाही, तर कर्तव्य हा मूळ अर्थ)
राष्ट्रसेवकोत्तम -इंडोनेशियन राष्ट्रीय पोलीस दल
सत्य-वीर्य-विचक्षणा -इंडोनेशियन सैनिकी पोलीस
__________________________________________
वरील नावावरून लक्षात येते की,ही नावे भारतीय असावित.
सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असूनही हिंदू संस्कृती जपणारा इंडोनेशिया हा एकमेव देश आहे.