नेपाळ येथील बुढानिळकंठ मंदिर

नेपाळ येथील बुढानिळकंठ मंदिर 


फेसबुक लिंक http://bit.ly/3f2U4nM
मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हे खूप प्रगत अवस्थेला पोहोचलं होतं. कुठलीही मूर्ती किंवा कोणतेही मंदिर बांधण्यामागे काही एक उद्देश असतो, एखादे तत्त्वज्ञान असते. ते समजून घेतले की, मंदिर पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या उत्साहाने पाहता येते.
काठमांडू पासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या शिवपुरी पर्वतरांगां मध्ये वसलेल्या तलहटी या गावात हे मंदिर आहे. श्रीविष्णू देवतेचे हे मंदिर आहे. या मंदिराचे नाव बुढानीलकण्ठ आहे. येथील एका नेपाळी राजपरिवाराला एक शाप असल्याची मान्यता आहे. त्यामुळे राजपरिवारातील कोणताही सदस्य या मंदिरात दर्शनासाठी कधीही जात नाहीत.
बुढानीलकण्ठ मंदिर एका नैसर्गिक तलावात बांधण्यात आले आहे. या मंदिरातील विष्णूंची मूर्ती भव्य आहे. ११ नागांच्या शेषशैय्येवर विराजमान ही मूर्ती रहस्यमय आहे. या मूर्तीची लांबी ५ मीटर असल्याचे सांगितले जाते. ज्या तलावात ही मूर्ती आढळून आली, त्या तलावाची लांबी १३ मीटर असल्याचे सांगितले जाते. शेषशैय्येवरील श्रीविष्णू एका पाय दुसऱ्या पायावर ठेवून निद्रावस्थेत आहेत. हे ११ नाग श्रीविष्णूंचे छत्र बनले आहेत.,या मंदिरात श्रीहरि म्हणजेच श्रीविष्णूंसोबत महादेव शिवशंकर विराजमान आहेत. एका पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनावेळी विष बाहेर आले होते, तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी महादेवांनी ते धारण केले. विषप्रभावामुळे महादेवांचा कंठ निळा पडला. विषामुळे जळजळ वाढली, तेव्हा महादेव उत्तरेकडे गेले. तेथे एका पर्वतावर त्रिशूळाचा प्रहार केला. त्रिशूळाच्या प्रहारानंतर तेथे पाण्याचा स्रोत उत्पन्न झाला. या तलावातील पाणी पिऊन घशातील जळजळ थांबवण्याचा प्रयत्न महादेवांनी केला. तोच हा तलाव असून, आता हा भाग गोसाईकुंड नावाने ओळखला जातो. या तलावात असलेल्या श्रीविष्णूंची मूर्ती एका शेतकऱ्याला मिळाली होती.

नेपाळ येथील बुढानिळकंठ मंदिर

नेपाळ मधील राजपरिवाला एक शाप आहे. या राज परिवारातील कोणत्याही सदस्याने बुढानीलकण्ठ मंदिरातील स्थापन असलेल्या श्रीविष्णूंच्या मूर्तीचे दर्शन घेतले, तर त्याचा मृत्यू होतो,असा शाप असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या राजपरिवारातील कोणताही सदस्य या मंदिरात जात नाही.
मंदिर, त्यावरील मूर्ती, मंदिरात असलेल्या विविध गोष्टी या काही विचार करून निर्मिलेल्या असतात.  इथे असलेली अनेक प्रतीके, चिन्हे, शिल्पे आपल्याला सतत मार्गदर्शन करीत असतात. मंदिर हे केवळ देवाचे निवासस्थान नसून ती एक सामाजिक संस्था आहे. इथे अनेक लोकांचा सतत वावर होत असल्यामुळे त्यांच्या शिकवणुकीसाठी, त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, तत्त्वज्ञान खूप सोप्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात रुजवण्यासाठी मंदिरांची, त्यावरील शिल्पांची आणि इतर गोष्टींची निर्मिती झाली असे म्हणता येईल.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম