किल्ले पद्मगड

        किल्ले पद्मगड 


फेसबुक लिंक http://bit.ly/3f6osME
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैशिष्ट्यपुर्ण पद्मगड, राजकोट, सर्जेकोट यांच्या साखळीतील पद्मगडाची आपण माहिती घेणार आहोत.
आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यास असे दिसते की,सिंधुदुर्ग आणि पद्मगड समोरासमोर आहेत.छ. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट ही किल्ल्र्‍यांची साखळी तयार केली. या किल्ल्र्‍यांपैकी पद्मगड हा समुद्रात असलेला किल्ला सिंधुदूर्ग आणि मालवण किनारा ह्र्‍यांच्या मध्ये उभा आहे.सिंधुदुर्गला जाण्यासाठी पाण्यातुन जावे लागते पण पद्मदुर्गला जाण्यासाठी पाण्यातुन जावे लागत नाही पण यासाठी समुद्राला ओहोटी असावी लागते.,भरती ओहोटीचे वेळापत्रक जर बरोबर साधले तर किल्यावर जाताना पाण्यातुन जाण्याचा प्रश्नच नाही.किनारयावर दांडगेश्वर देवाचे मंदिर आहे.छोटे प्रवेशद्वार अजून शाबूत आहे.किल्यात कोळी लोकांचे वेताळाचे मंदिर आहे.गडाचे बुरुज व तटबंदी याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. किल्ल्यात एक कोरडी विहिर दिसुन येते.

समुद्राच्या मार्गाने होऊ शकणार्‍या संभाव्य हल्ल्याचा विचार करुन शिवाजी  महाराजांनी सिंधुदूर्ग व मालवण किनार्‍यामधील खडकावर पद्मगड किल्ला बांधला असावा.पद्मगड भोवतालचा खडक विशिष्ट तर्‍हेने फोडून तेथे नविन जहाजे बांधण्याची व जुनी जहाजे दुरुस्त करणारी गोदी उभारण्यात आली होती.त्याचे अवशेष दगडाच्या रूपात इतरत्र पडलेले दिसतात.इतिहासात किल्याने मोठी कामगिरी केली असावी.सिंधुदुर्गला भेट देणारे पर्यटक माहिती नसलेने या किल्याकडे फिरकत नाहीत.इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला सिंधुदुर्ग किल्ला बरोबर भेट दयावी.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498

किल्ले पद्मगड

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম