किल्ले सिध्दगड
(मालवण)
फेसबुक लिंक http://bit.ly/3nWDgSh
महाराष्ट्रात सिध्दगड नावाचे दोन किल्ले आहेत.एक ठाणे जिल्ह्यात आहे,तर दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे.आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिध्दगड पाहुया.हा किल्ला सावंतवाडी येथील सावंतवाडी कर सांवतानी बांधला अशी नोंद मिळते.त्याकाळात समुद्र मार्गे मालवण बंदर, आचरा बंदर या ठिकाणी उतरणारा माल,फोंडा,अणुस्करा व आंबा घाटमार्गांनी घाटावरील बाजारपेठात जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्याकाळी मोक्याच्या जागी किल्ले बांधण्यात आले.त्यापैकी हा सिध्दगड होय.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,या किल्यामुळे बंदरावर,घाटमार्गावर टेहळणी करता येत होती.सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिध्दगड हा किल्ला मालवण, आचरा बंदरहून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणार्या मार्गावरील घोटगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.गडावर सांवताचा पुर्ण ताबा होता.पोर्तुगिज व इंग्रज यांना हा गड डोळयात खुपत होता.मे १८१८ मध्ये इंग्रज कर्नल इम्लाक याने किल्ल्यावर हल्ला करुन घेण्याचा प्रयत्न केला.पण किल्ल्यावरुन झालेल्या कडव्या प्रतिकारात त्याची जबर हानी झाली.या युद्धात त्याला माघार घ्यावी लागली.परत इम्लाक याने काही काळानंतर मालवण येथील इंग्रज रेजिमेंटची तुकडी मागवुन घेतली व पुर्ण तयारीने सिध्दगडावर हल्ला केला. यावेळी मात्र त्याला यश आले. व हा किल्ला इंग्रजाच्या ताब्यात गेला. या लढाईत किल्ल्याची मोठी धासधुस झाली. म्हणुन तर आता गडावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत.सिध्दगड २५ एकरावर पसरलेला असून किल्ल्याच्या कुठल्याही खुणा आजमितीस गडावर नाहीत. गडावर प्रवेश केल्यावर आपल्याला लांबवर पसरलेल्या जांभ्या दगडाचे पठार दिसते. मालवणी भाषेत याला काप किंवा सडा म्हणतात. या सड्यावर वस्ती आहे, त्याला सिध्दगडवाडी म्हणतात. सड्याच्या टोकावरुन आजुबाजूचा विस्तृत प्रदेश व कसाल नदी दृष्टीक्षेपात येते.तसे पाहायला गडावर काही नाही.आहेत त्या फक्त नि फक्त जखमी खुणा.स्थानिक लोकांना इतिहास सांगता येत नाही.
किल्लावर कसे जाल
मालवण व कणकवली या दोन्ही शहरातून येथे जाता येते.ओवळीचे हे सिध्दगडच्या पायथ्याचे गाव आहे.तेथुन जवळच सिध्दगड आहे.दुसरा मार्ग म्हणजे कणकवलीहून मुंबई - गोवा महामार्गाने कुडाळकडे जाताना कसाल गावाच्या (१ किमी) अगोदर ओवळीचे फाटा उजव्याबाजूस
आहे. तेथून ओवळीये २ किमी वर आहे.विस्म्रुुतीत गेलेला हा किल्ला आवर्जून पहावा तो फक्त इतिहासासाठी.