खेळाडुंच्या हत्येचा बदला इस्त्रायलने कसा घेतला ?

  खेळाडुंच्या हत्येचा बदला इस्त्रायलने कसा घेतला ?

फेसबुक लिंक http://bit.ly/3wpB2xB
जर्मनीत म्युनिकमधे १९७२ ला ऑलिम्पिक खेळ होते. त्यात इस्रायलचे २८ खेळाडू सहभागी होते. मात्र खेळ सुरू होण्याआधी ५ सप्टेंबर १९७२ ला पहाटे ४ वाचून ४० वाजता काही दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्रांसह इस्रायली खेळाडूंना ताब्यात घेऊन ओलिस ठेवलं. त्यात ११ खेळाडूंचा जीव गेला.

तुम्हाला माहीत आहे,खेळाडुंच्या हत्येचा बदला इस्त्रायलने कसा घेतला ते?

पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि जर्मनीतली दहशतवादी संघटना आरएएफ यात सामील होते. लिबरेशन ऑर्गनायझेशन ही संस्था खेळांचं प्रशिक्षण देत असे. त्यांना ऑलिम्पिकमधे सहभागी व्हायचं होतं. मात्र पॅलेस्टाईन हा पूर्णपणे देश न बनल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. पण इस्रायलला मिळाला म्हणूनच त्यांनी ऑलिम्पिकमधे वेगळ्या प्रकारे जायचं ठरवलं. आणि त्यांनी ऑलिम्पिकमधे दहशतीचा वेगळाच खेळ दाखवला.,दहशत वाद्यांनी खेळाडूंना जिवंत ठेवण्याच्या बदल्यात जर्मन आणि इस्रायलच्या कैदेत असणाऱ्या २३४ जणांना सोडवण्याची मागणी केली. दहशतवादी खेळाडूंना बंदी बनवून घेऊन जात असताना जर्मन सैन्याने एअरपोर्टवर हल्ला केला. त्यात ९ खेळाडू, ५ दहशतवादी मारले गेले. ३ दहशतवाद्यांना जर्मनीच्या सैनिकांनी ताब्यात घेतलं. या घटनेला दोन महिने झाले नाही तोच दहशतवाद्यांनी लुफ्तांसा एअरलाइन्सचं विमान हायजॅक केलं.
दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला
या एकामागोमाग एक होणाऱ्या दुदैवी घटनानंतर इस्रायलच्या आई, आजी, आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी त्या सर्व दहशतवाद्यांना संपवण्याचं ठरवलं.
त्यांनी ऑक्टोबरपासून इस्रायलच्या कमिटी एक्समधे हुशार इंटलिजन्स एजंटची भरती केली. त्यानंतर त्यांनी पॅलेस्टाईनमधे हल्ले करायला सुरवात केली. त्यांच्या पहिल्याच हल्ल्यात दहशतवाद्यावर ११ गोळ्या झाडण्यात आल्या. पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी इस्रायलचे ११ खेळाडू मारले होते. हे लक्षात आल्यामुळे दहशतवादी संघटनांच्या लक्षात आलं की हे काम मोसादचं आहे.
मोसाद आणि कमिटी एक्स या इस्रायलच्या इंटलिजन्सी एजन्सी होत्या. त्यांनी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची यादी बनवली. त्यानुसार त्यांना त्यांच्या देशात, त्यांच्या घरात घुसुन मारलं. दहशतवाद्यांच्या बिछान्यात, फोनच्या रिसिव्हरमधे बॉम्ब लावून स्फोट घडवून आणले.
युरोपमधे त्यांनी अनेक दहशतवाद्यांना मारलं त्यातला एक कॉमन पॅटर्न म्हणजे ११ गोळ्या झाडणं. मात्र इस्रायलने प्रत्येकवेळी यामागे आमचा हात नाही असं म्हटलं. पुढे ९० च्या दशकापर्यंत हे ऑपरेशन सुरू राहिलं. हे काम करण्याचे आदेश स्वत: पंतप्रधान गोल्डा यांनी दिल्याचं सांगितलं जातं.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
कोरा लिंक http://bit.ly/3uaNjEK

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম