प्राचीन जैन मंदिर इब्राहिमपूर ता. चंदगड, जि कोल्हापुर

प्राचीन जैन मंदिर इब्राहिमपूर ता. चंदगड, जि कोल्हापुर 

फेसबुक लिंक http://bit.ly/3bMIYkz
भारतीय संस्कृती आणि सभ्यता नेहमीच जगाला मार्गदर्शक ठरलेली आहे.अनेक नवीन कला आणि संस्कृती या देशात जन्माला आल्या. आजही त्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा भारता मध्ये बघायला मिळतात.भारतामध्ये फक्त एकाच संस्कृतीच्या नव्हे, तर अनेक मिश्रित संस्कृतीच्या आठवणी देखील तुम्हाला जुन्या वास्तु कलेतून बघायला मिळतील.
आपल्याकडे आजही अनेक अशा पुरातन वास्तू उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्हाला अनेक संस्कृती आणि सभ्यता यांचा संगम बघायला मिळेल.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात इब्राहिमपूर या गावी जवळपास ११ व्या शतकातील राष्ट्कुट काळातील भगवान पार्श्वनाथांची हेमाडपंती वास्तुशैली असलेले जुळी मंदिर आहेत. या मंदिराच्या बांधकामामध्ये काळा दगड वापरला आहे.

प्राचीन जैन मंदिर इब्राहिमपूर ता. चंदगड, जि कोल्हापुर

भगवान पार्श्वनाथ:
पार्श्वनाथ (पार्श्वनाथ), ज्यांना पार्श्व आणि पारस म्हणून ओळखले जाते, हे जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर (धर्म-प्रचारक) होते. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूर्वीच्या तीर्थंकरांपैकी ते एक आहेत.जैन स्त्रोतांनी त्यांना इ.स.पू. ८ व्या आणि ९ व्या शतकाच्या दरम्यान स्थान दिले आहे तर इतिहासकारांनी असे सूचित केले आहे की ते इ.स.पू. ७ व्या किंवा ८ व्या शतकात हयात होते. पार्श्वनाथांचा जन्म महावीरच्या ३३२ वर्षांपूर्वी झाला होता. ते २२ व्या तीर्थंकर नेमिनाथ यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी होते. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,त्यांना जैन धर्माचा प्रसारक आणि संजीवनी देणारा म्हणून पाहिले जाते. त्यांची मूर्ति त्यांच्या डोक्यावर असलेल्या सर्पाच्या कपाटासाठी उल्लेखनीय आहेत आणि त्यांच्या पूजेमध्ये अनेकदा धरणेंद्र आणि पद्मावती (जैन धर्माचे सर्प देवता आणि देवी) यांचा समावेश आहे.इब्राहिमपुर मध्ये पूर्वीच्या काळी इथे नक्कीच यापेक्षा जास्त मंदिरे असतील, काळाच्या ओघात ती नामशेष झाली, त्याचे अवशेष व खानाखुणा परिसरात पसरलेल्या आढळतात.तपोवन म्हणजे जंगलात तपश्चर्या करण्यासाठी निर्माण केलेला भाग,येथे एकसारखी दोन मंदिरे आढळतात.
इब्राहिमपुर मध्ये आज कोणीही जैन समाजाचे राहत नाही.यामुळे मंदिर दुर्लक्षित झाले होते.
Ancient Jain Temple Ibrahimpur Ta. Chandgad, Dist. Kolhapur,

भगवान पार्श्वनाथ यांच्या पहिले जैन धर्मात  प्रचलित असलेल्या श्रवण धर्माबाबत सर्व सामान्य लोकांना फारशी माहिती नव्हती. भगवान पार्श्वनाथ यांच्यापासून लोकांना श्रमण धर्म समजला. त्यामुळे भगवान पार्श्वनाथ यांच्या कारकिर्दी प्रमाणे त्यांच्या मूर्तीचे दर्शन जरी घेतले तर जीवाला शांती मिळते.
जैन धर्मियांचे तीर्थकार होण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की,   भगवान पार्श्वनाथ यांना तीर्थकर बनण्यासाठी नऊ जन्म घ्यावे लागले होते. पहिला जन्म ब्राह्मण, दुसरा जन्म हत्ती, तिसरा जन्म स्वर्ग लोकांतील देवता, चोथा जन्मात राजा, पाचवा जन्म देव, सहावा जन्म चक्रवर्ती सम्राट, सातवा जन्म देवता, आठव्या जन्मात राजा, आणि नव्या जन्मात राजा इंद्रदेव हे नऊ जन्म घेतल्यानंतर दहाव्या जन्मात त्यांना जैन धर्मियांचे तीर्थकर होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
=======================================

Ancient Jain Temple Ibrahimpur Ta. Chandgad, Dist. Kolhapur
-----------------------------------------
MAHITI SEVA Group Pethwadgaon
-----------------------------------------
Facebook link http://bit.ly/3bMIYkz
Indian culture and civilization has always been a guide to the world. Many new arts and cultures were born in this country. Even today, you can see the footprints of that ancient culture in India. In India, you will find memories of not only one culture, but also many mixed cultures through old architecture.
We still have a lot of antiquities available today in which you will find a confluence of many cultures and civilizations.
In the village of Ibrahimpur in Chandgad taluka of Kolhapur district, there are twin temples of Lord Parshvanath with Hemadpanti architecture dating back to the 11th century Rashtrakuta period. Black stone is used in the construction of this temple.

Lord Parshvanath:
Parshvanath (Parshvanath), also known as Parshva and Paras, was the 23rd Tirthankar (preacher) of Jainism. He is one of the earliest known Tirthankars to be known as a historical figure. Located between the 8th and 9th centuries, historians suggest that it dates back to BC. Survived in the 7th or 8th century. Parshvanath was born 332 years before Mahavira. He was the spiritual successor of the 22nd Tirthankar Neminath. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, they are seen as propagators and revitalizers of Jainism. His idols are notable for the serpent's cupboard on his head, and his worship often includes Dharanendra and Padmavati (the serpent deities and goddesses of Jainism). Tapovan is a part of the forest created for penance. There are two identical temples here.
There is no Jain community living in Ibrahimpur today. Due to this, the temple was neglected.
All the common people did not know much about Shravan Dharma which was prevalent in the first Jain religion of Lord Parshvanath. From Lord Parshvanath, people understood Shramana Dharma. Therefore, even if one takes darshan of his idol like the career of Lord Parshvanath, the soul gets peace.
It is believed that Lord Parshvanath had to take nine births to become a pilgrim. The first born Brahmin, the second born elephant, the third born deity in the heavens, the fourth born king, the fifth born god, the sixth born Chakravarti emperor, the seventh born deity, the eighth born king, and the new born king Indradev in the tenth birth Had the good fortune to be.
MAHITI SEVA Group Pethwadgaon
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম