म्हणून टायरचा रंग काळा असतो

⚫ ...म्हणून टायरचा रंग काळा असतो ! ⚫



फेसबुक लिंक http://bit.ly/2Tvkg1N
कधी कधी आपल्या आजूबाजूला रोज आपण अनेक गोष्टी पाहत असतो; पण त्या ‘तशा’च का आहेत याचा विचार आपल्या मनात कधी येत नाही. काही चौकस, जिज्ञासू लोकांच्या मनात मात्र कधी तरी असे विचार डोकावत असतीलही. गाडीच्या टायरचा रंग हा काळाच का असतो असा विचार आपण कधी केला आहे का? जगात कुठेही गेले तरी टायर ही काळीच दिसून येईल. भारतातच नव्हे तर परदेशात कारचे देखील काळ्या रंगाचे टायर्स असतात.
सर्व साधारपणपणे रबराचा रंग हा दगडी असतो. मात्र, टायर बनवला जातो त्यावेळी त्याच्या रंगात परिवर्तन होते.

म्हणून टायरचा रंग काळा, so the color of the tire is black!

साधारण रबरने तयार केलेला टायर घर्षणामुळे लवकर झिजतो.  त्यामुळे पूर्वी त्याला वारंवार बदलावे लागे. पुढे  या समस्येवर संशोधन झाले आणि यातून एक नामी उपाय शोधण्यात आला. रबरी टायर तयार करताना त्यात सल्फर आणि कार्बन मिसळण्यात आले आणि यातून एक मजबूत टायर तयार झाला.टायरला ‘व्हल्कनायझेशन’ या प्रक्रियेतून टायर बनवली जाते. नैसर्गिक रबर म्हणजेच लेटेक्समध्ये कार्बन ब्लॅक मिसळले जाते. त्यामुळे हे रबर मजबूत होते आणि लवकर झिजत नाही. जर साध्या रबराचे टायर आठ हजार किलोमीटर जात असेल तर कार्बनयुक्त टायर एक लाख किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. काळ्या कार्बनच्याही अनेक श्रेणी असतात. त्यामध्ये सल्फरही मिसळले जाते. कार्बन ब्लॅकमुळेच टायर काळी दिसत असते. त्यामुळे टायरीचे अल्ट्राव्हायलेट म्हणजेच अतिनील किरणांपासूनही रक्षण होते. तसे पाहता लहान मुलांच्या सायकलींच्या टायर वेगवेगळया रंगांच्या असू शकतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये चक्क सफेद टायरीही असत; मात्र मजबुती आणि सुरक्षेसाठी आता जगभर अशा काळ्या टायरच वापरल्या जातात.तुमची गाडी मग ती कोणत्याही रंगाची असो टायर मात्र काळया रंगाचाच असणार याचे कारण हे आहे. 

=======================

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম