माहिती सेवा ग्रूप पेठवडगावच्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण

✍️‼️✍️‼️✍️‼️✍️‼️✍️


माहिती सेवा ग्रूप पेठवडगावच्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण

✍️ ब्लॉगची वर्षेपुर्ती

___________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
___________________________
दि २१ जुन २०२० चा जुनचा महिना चालू होता. लॉकडाऊन होऊन अडीच महिने झाले होते. काहीशी शिथिलता आली होती.घरी बसुन बसुन कंटाळा आला होता.फिरणे बंद झाले होते.आणि एके दिवशी विचार आला..आपण गेली पाच सहा वर्षे whatsApp, व Facebook वर पोस्ट टाकतो. त्या चांगल्या आहेत याची प्रतिक्रिया पण वाचकाकडुन येते.पण त्या पोस्ट आपण कधी कोठे साठवुन ठेवल्या नाहीत.


कधितरी एखादा वाचक,"गेल्या महिन्यातील ती अमुक अमुक पोस्ट होती ती पाठवा" असे म्हणुन त्याचा मेसेज येतो.मग पंचाईत होते,पोस्ट आपण लिहिली होती. पण आहे कोठे? फेसबुकवर  शोधाशोध केली तर मिळतेच अशी नाही. या करता मग ठरवले आपण या चांगल्या पोस्ट कोठेतरी साठवुन म्हणजे save करून ठेवायला पाहिजेत.माझे मित्र व व्हॉटसअपचे दुसरे अॅडमिन  विक्रम धनवडे भादोले यांच्याशी चर्चा केली.त्यांचा पण तोच प्रॉब्लेम होता. मग ठरले  की आपण ब्लॉग काढुया.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगावच्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण,Mahiti seva Group Pethwadgaon's blog completes one year

ब्लॉग काढायचे ठरले पण त्यातील आो की ठो माहिती नव्हते. मग लॉकडाऊनचा रिकामा वेळ सार्थकी लावला  युट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहिले पण डोक्यात जाईना. परत परत व्हिडिओ पाहिले व एकदाचे ब्लॉग अंकाउट काढले.
आता ब्लॉग तर काढला पण त्यात भरायचे काय?  नाव काय दयायचे?मग, व्हॉटसअप वर केली जाणारी माझी प्रत्येक पोस्ट ब्लॉग वर कॉपीपेस्ट करण्यास सुरूवात केली. व ब्लॉगला नाव हेच आपले "माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव" असे दिले.  माझी ब्लॉग ला पहिली पोस्ट "दिल्लीतला मिनी कुतुबमिनार"या नावाची होती.
(लिंक http://bit.ly/3gqxvKl )
तोवर ब्लॉग पोस्टला लेबल कसे लावायचे,हेंडिग कसे दयायचे, हेंडिगफोटो कसा लावायचा याची काही माहिती नव्हती.उपक्रम पुढे चालुच ठेवला. हळुहळू सुधारणा होत गेली.
ब्लॉग कसा लिहायचा,त्यात अनावश्यक गोष्टी कशा येऊ द्यायचा नाहीत.ब्लॉग आकर्षक कसा करायचा.हे शिकत गेलो. मग ब्लॉग पोस्टची लिंक शेअर करायला सुरुवात केली आणि ब्लॉग पाहणारयाची संख्या वाढु लागली. मग त्या ब्लॉगला चांगली थीम(टेम्पलेट) कशी लावायची ते युट्यूबवर व्हडिआो पाहत ती थीम लावली.
याच काळात माझे दुसरे मित्र शेळेवाडीचे प्रा.सुभाष सांमत(सध्या रा. करमाळा) यांचे  linknewsindia.com  हे न्युज पोर्टल पाहण्यात आले.त्यांनी ते कसे काढले त्यासाठी काय काय केले याची माहिती फोनवरून घेतली.व माझ्या ब्लॉगला मी न्युजपोर्टलचे स्वरूप दिले. 
मग काय ब्लॉग पाहणारयांची संख्या वाढत जाऊ लागली, पन्नास हजार,एक लाख,दोन लू,तीन,चार पाच लाख असे करत आज माझा ब्लॉग एका वर्षात नऊ लाख लोकांनी पाहिला. गुगलने याची दखल घेतली. ब्लॉग वर जाहिरात लावण्या विषयी विचारणा केली. 
पण  आतापर्यंत माहितची पोस्ट मी फेसबुक,व्हॉटसअपसह  विविध सोशल मीडियावर प्रस्तुत केली ती पैसे मिळवण्यासाठी तर नक्कीच नाही म्हणुन गुगलला नम्र नकार कळवला आहे. तरीही गुगलचे विचारणा करणारे ईमेल अजुन चालुच आहेत.
मध्यंतरी मित्र विक्रम धनवडे यांनीपण ब्लॉग चालु केला.त य त्यांच्या ब्लॉगला पण "माहिती सेवा ग्रूप"(भादोले) असे नाव दिले.त्यांच्या ब्लॉगची लिंक  vikramdhanwademahitiseva.blogspot.com अशी आहे.वाचकांनी त्या लिंकवर जाऊन भेट दयावी.
आज माझ्या १२०० पोस्ट ब्लॉग वर प्रसिद्ध झाल्या आहेत.
आपण वाचकानी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे. आपले प्रेम यापुढेही असेच मिळो ही विनंती.

अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
=======================================================
Mahiti seva Group Pethwadgaon's blog completes one year

 Years of blogging

___________________________
Mahiti seva Group Pethwadgaon
___________________________
June 21, 2020 was the month of June. It had been two and a half months since the lockdown. There was some relaxation. I was bored sitting at home. I stopped walking. And one day I came up with an idea. We have been posting on WhatsApp and Facebook for the last five or six years. But the feedback comes from the reader that they are good. But you have never stored those posts anywhere.
Sometimes a reader gets a message saying, "Send that was some post from last month". Then there was the panchayat, the post was written by you. But where is it? Doing a search on Facebook is not the answer. After doing this, I decided that we should save these good posts somewhere. I had a discussion with my friend and another admin of WhatsApp, Vikram Dhanwade Bhadole. He also had the same problem. Then we decided to start a blog.
I decided to start a blog but I didn't know much about it. Then the free time of the lockdown made sense. I watched many videos on YouTube but it didn't cross my mind. Watched the video again and removed the blog account once.
Now I have removed the blog but what to fill in it? What's in a name? So, I started copying and pasting every post I made on WhatsApp. And the name of the blog is "Mahiti seva Group Pethwadgaon". The first post to my blog was called "Mini Qutub Minar in Delhi".
Until then, I had no idea how to label a blog post, how to give a handing, how to put a handing photo. The project continued. Gradually improvements were made.
How to write a blog, how not to let unnecessary things come in it. How to make a blog attractive. Then I started sharing the link of the blog post and the number of blog viewers started increasing. Then she posted a video on YouTube on how to make a good theme (template) for that blog.
At the same time, another friend of mine, Prof. Subhash Sammat of Shelewadi (now resident of Karmala) saw the news portal linknewsindia.com. He took information over the phone about how he got it out. I turned my blog into a news portal.
So the number of blog viewers started increasing, doing fifty thousand, one lakh, two loo, three, four five lakh, today my blog is viewed by nine lakh people in a year. Google noticed this. Asked about advertising on the blog.
But the post I know so far has been submitted on various social media including Facebook, WhatsApp to get the money, of course not, so Google has politely refused. However, Google's inquiries are still ongoing.
Interim friend Vikram Dhanwade also started a blog. He also named his blog as "Mahiti seva Group" (Bhadole). The link of his blog is vikramdhanwademahitiseva.blogspot.com. Readers should visit that link.
Today my 1200 posts have been published on the blog.
I thank you for the overwhelming response from your readers. May your love continue to be the same.

Anil Patil Pethwadgaon
9890875498
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম