रिक्षा नव्हे, तीन चाकी कार ! अशी कार भारतात होती

रिक्षा नव्हे ,तीन चाकी कार ! अशी कार भारतात होती 

     फेसबुक लिंक http://bit.ly/3ivkL6t
 हे तीन चाकी वाहन कोणते म्हणुन कोणालाही विचारले तर त्याचे उत्तर "रिक्षा" हेच असेल.पण तीन चाकी कारचा कोणी विचारही करणार नाही.पण तीन चाकी कार आपल्या भारतातसुद्धा होती.तिचे नाव होते "सिपानी".

तीन चाकी कार ! रिक्षा नव्हे  अशी कार भारतात होती,Three wheeled car! There was a car in India that was not a rickshaw,

राम बलराम चित्रपटात आमिताभ बच्चन व धर्मेन्द्र ने "एक रास्ता" या गाण्यावेळी हि कार वापरलेली आपणास पाहावयास मिळते.ही कार सुरुवातीला सनराईज ऑटोमोटिव्ह लिमिटेड यांच्यामार्फत बनविली जात होती. पुढे जाऊन तिचे नाव सिपानी लिमिटेड करण्यात आले.यानंतर कंपनीने "बादल" नावाने १९७६ ला मार्केटमध्ये लॉन्च केली. तीन चाके आणि तीन दरवाजे अशी या कारची डिजाईन होती.,पॅसेंजर साईडला दोन दरवाजे, तर ड्रायव्हर साईडला एक दरवाजा अशी या कारची रचना करण्यात आली होती.या गाडीत ३-४ लोक आरामात बसू शकत असत.या कारला १९८सीसी ४ स्ट्रोक पेट्रोल इंजिन होते. ही कार फायबर ग्लासची बनविण्यात आली होती.
कारचे उत्पादन १९६६ मध्ये सुरू झाले. ही तीन चाकांची असामान्य दिसणारी कार होती जी लहान सीसीसी इंजिनद्वारे चालविली जात होती.  जी ९.८ एचपी उर्जा उत्पादन करते. इंजिन मागील  माउंट केलेले होते आणि मागील चाकांना शक्ती देण्यास वापरले जाते.या कंपनिला त्यावेळी बजाजची रिक्षा व लॅम्ब्रेटरची रिक्षा प्रति स्पर्धी होती.पण तीन चाकी मॉडल लोकांना काहीसे आवडले नाही. जर विक्रीचा आलेख पाहिला तर कंपनी १९७७ मध्ये २०० च्या आसपास युनिट विकू शकली होती,तर पुढच्या वर्षी मागणी वाढून ३५० युनिट्सवर गेली. त्यानंतरच्या वर्षात ही मागणी केवळ १०४ वर आली.१९८१ पर्यंत केवळ ५५ युनिटस विक्री झाली.कंपनी तोटयात जाऊ लागल्याने हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.  
लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही हे बघून कंपनीने मग यातच बदल करून ४ व्हीलर कार मार्केटमध्ये आणली.पण तोही प्रयत्न फसला. बादलची चार चाके आवृत्ती आणि डॉल्फिन, माँटाना आणि माँटेगो यासारखी आणखी काही मॉडेल्स आणूनही ही कंपनी भारतीय बाजारामध्ये आपला ठसा उमटवू शकली नाही.
हळूहळू करत १९९० साली  सिपानी कार बंद झाली.आता ही कार फक्त संग्रहालयात पाहावयास मिळते.  

               ✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺
                  
-------------------------------------------

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম