संभाजी महाराज यांच्या नावावरून सांबार शब्द तयार झाला,असा मेसेज व्हायरल होत आहे

 

संभाजी महाराज यांच्या नावावरून सांबार शब्द तयार झाला,असा मेसेज व्हायरल होत आहे 

काय आहे सत्य

सांबार या शब्दाचे अनेक अर्थ असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज आपण ज्या आमटीसारख्या पातळ पदार्थाला सांबार म्हणतो त्याचा मूळ अर्थ तोंडीलावणं असा आहे.
संभाजी महाराज व सांबार


सांबार हा आज खाल्ला जाणारा पदार्थ पहिल्यांदा कुठे तयार झाला असा प्रश्न विचारला की एक ठरलेली कथा सांगितली जाते ती म्हणजेएके दिवशी छत्रपती संभाजी महाराज तंजावरला गेले होते. मात्र शाहुजी महाराजांच्या मुदपाकखान्यात त्यादिवशी आमटीमध्ये घालायला कोकमं नव्हती. तेव्हा कुणीतरी त्यांना कोकमाऐवजी चिंच घालून पाहू असं सुचवलं आणि त्याप्रमाणे चिंच घातलेली आमटी तयार करण्यात आली.संभाजी महाराजांचा आदर करण्यासाठी त्याला संभाजी+आहार (संभाजी महाराजांचा आहार) अशा अर्थाने सांभार असं नाव देण्यात आलं. हीच आमटी पुढे सर्वत्र वेगवेगळ्या घटकांसह बदलत बदलत दक्षिण भारत मग भारतभर पसरली आणि सांबार नावाने आज प्यायली जाते व ,छ संभाजी महाराज यांच्या नावावरून सांबार हा शब्द तयार झाला,पण सांबार या शब्दाची व्यत्पुती इतिहासात पाहिली की समजते की ही ठरलेली कथा म्हणजे संभाजी महाराज व सांभार यांचा परस्पर काही संबंध नाही.,छ. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत ते तंजावरला गेल्याचे तसंच अशी सांबार बनवण्याची घटना घडल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. १७ व्या शतकातील मराठ्यांच्या आहारातील पदार्थांचे फारच कमी संदर्भ उपलब्ध आहेत. त्यामुळे या कथेला फारसा आधार मिळत नाही.काही अभ्यासकांच्या मते सांबार हा शब्द संस्कृतमधील 'सम्भार' या शब्दाशी मिळता जुळता आहे."सांबार या शब्दाच्या व्युत्पत्तीचे द्राविड आणि इंडोइराणी कोषांतील वेगवेगळे आयाम न पाहाता हा शब्द संभार या संस्कृत शब्दावरूनच आला आहे.
महाराष्ट्रामध्ये सांबार किंवा सांबारु या अर्थाचा शब्द पूर्वीपासून प्रचलित असल्याचं दिसून येतं."चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्राच्या पूर्वार्धात दोनशे साठाव्या लीळेत "सांबारू" शब्दाचा तोंडी लावणं असा उल्लेख येतो.
लीळाचरित्रातल्या या उल्लेखांवरून स्पष्ट होतं की, सांबारू (म्हणजे भाजीत घालायचा मसाला) आणि सांबारिव (तोंडीलावणं) हे दोन्ही शब्द तेराव्या शतकात महाराष्ट्रात प्रचलित होते."तसंच एकनाथ महाराजांचे नातू मुक्तेश्वरांनी केलेल्या राजसूययज्ञाच्या वर्णनातही सांबार पदार्थाचा उल्लेख दिसतो.
तंजावरवर मराठ्यांनी राज्य करण्यापूर्वी तेथे नायक घराण्याचं राज्य होतं. त्यातील रघुनाथ नायक या राजाच्या एका दिवसाचं वर्णन करणारं 'रघुनाथभ्युदयमु' नावाचं काव्य आहे. त्यात राजाच्या जेवणातील पदार्थांची भलीमोठी यादी आहे. त्यात संबाररोटी आणि संबार घातलेला भात अशा पदार्थांचा उल्लेख आहे.
यावरून असा ठोकळ अंदाज बांधता येतो की,छ. संभाजी महाराज व सांभार यांचा काहीही परस्पर संबंध नसावा.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম