जागतिक सायकल दिन

 

  जागतिक सायकल दिन  

               



शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे.
याच सायकलची महत्त्व ओळखून युनायटेड नेशन्सने पुढाकार घेत ‘जागतिक बायसिकल दिन’ साजरा करण्याचे ठरवले, आणि 3 जून हा दिवस जागतिक बायसिकल दिन म्हणून साजरा करू लागले. हा दिवस साजरा करण्याचे २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सने नक्की केले, आणि ३ जून हा जागतिक बायसिकल दिन म्हणून ओळखला जातो.पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरणे केली.  गरिबांचे वाहन अशी ओळख सायकलला आहे.
जागतिक सायकल दिन,World Cycle Day


सायकल हा शब्द जरी उच्चारला तरी अनेक जण त्यांच्या सुरेख भूतकाळात जातात आणि त्यांच्या त्या जुन्या सायकलवरून गावाची भ्रमंती करूनच परततात. आज पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या लोकांसाठी तर त्यांच्या तरुणपणी सायकल असणे ही गोष्टच मोठी आनंददायी असायची. काळाच्या ओघात प्रवास लांबला आणि सुबत्ता वाढू लागली तशी प्रत्येक घरची सायकल अडगळीत जाऊ लागली आणि दुचाकी, चारचाकी तिच्यापुढे मिरवू लागल्या.जगण्याचा वेग वाढला, वेळ कमी पडायला लागला, हातात पैसा आला, मोठ्या वाहनांची गर्दी वाढल्यामुळे रस्त्यावरची सुरक्षितता कमी झाली, सायकल चालवणारा जास्तीतजास्त काळ रस्त्यावर वावरत असल्यामुळे त्याच्या वाट्याला हवेतलं प्रदूषण जास्त येतं तर ते टाळणं अशा कारणांमुळे मधल्या काळात इतर दुचाकींचं प्रमाण वाढलं. पण आता पुन्हा एकदा सायकलला प्रतिष्ठा यायला लागली आहे. याचा अर्थ आपल्याकडे लगेच सगळेजण इतर दुचाकी वाहनं बाजूला ठेवून सायकली चालवायला घेतील असं नाही. ते शक्यही नाही, पण आवडीने सायकलं विकत घेणं, जवळची आणि सुरक्षित अंतरं सायकलवरून पार करणं, सायकल मोहिमा आखणं अशा गोष्टी लोक पुन्हा करायला लागले आहेत, हेही नसे थोडके.
सायकलवर उपजीविका असणाऱ्या लोकांचे प्रमाणही आज लक्षणीय आहे. फेरीवाले, भाजीवाले, वर्तमानपत्र विक्रेते, फुलविक्रते,फुगेवाले, इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करून देणारे हे सर्व लोक आजही उपजीविकेसाठी सायकलवरच शहराच्या विविध भागांत फिरतात. याशिवाय कामगार मंडळीही आज त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचाच वापर करतात.
सायकल हे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोत्तम असणारे वाहन आहे. सायकलस्वाराचे आरोग्य तर सायकल सांभाळतेच; पण पर्यावरणाचे आरोग्यही उत्तमपणे सांभाळते. त्यामुळे प्रत्येक शहरात सायकलस्वारांचे प्रमाण वाढणे, शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे.तिला विकासाचे व आरोग्याचे प्रतिक बनवुया.   

          
              
-------------------------------------------





थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম