भुताने झपाटलेली रेल्वे स्थानके
भुतांच्या निवासाच्या जागा, या त्यांच्या जातींप्रमाणे तिकाटण्यावर (जिथे तीन रस्ते एकत्र येतात) आपापली स्मशाने, पडक्या विहिरी, पडके वाडे, पडकी घरे, जुने वृक्ष, देवराया, बुरूज, जंगले, पाणवठे, धरणाच्या भिंती, गावांच्या वेशी, वा नदीचे किंवा डोंगरवाटेचे घाट या आहेत. मुंजे, समंध हे प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर अशा झाडांवर वास करतात. अशी झाडे उपलब्ध नसतील तर गोड, सुगंध देणाऱ्या झाडांवर वास करतात असे समजले जाते.आज पाहुया भुताने झपाटलेली भारतातील रेल्वे स्थानके.
💀चित्तूर रेल्वेस्थानक-
देशातील सर्वात भीतीदायक रेल्वेस्थानकांध्ये आंध्र प्रदेशच्या चित्तूर रेल्वेस्थानकाचाही समावेश होतो. रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणार्या नागरिकांचा दावा आहे की, या परिसरात एकदा सीआरपीएफचा एक जवान रेल्वेतून उतरला होता. त्याचे नाव हरी सिंह असे होते. या जवानाला आरपीएफ आणि टीटीई या दोघांनी मिळून खूप मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. आता हरी सिंह याचा आत्मा रेल्वेस्थानक परिसरात न्यायासाठी फिरत असतो, असे तेथील नागरिक सांगतात.
💀बेगुनकोदर रेल्वेस्थानक
पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील बेगुनकोदर रेल्वेस्थानकावर प्रवाशांना पांढर्या रंगाच्या साडीत एक महिला भूत दिसते, स्टेशन परिसरात भूत असल्याच्या या दाव्यांमुळे तब्बल ४२ वर्षे हे रेल्वे स्थानक बंद होते. अखेर २००९ मध्ये हे रेल्वेस्थानक पुन्हा सुरू करण्यात आले होते.तरीही माणसांच्या मनातील भुते जात नाहीत
💀बडोग रेल्वेस्थानक-
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात बडोग नावाचे एक छोटे आणि सुंदर रेल्वे स्थानकालाही भुताचे रेल्वेस्थानक असे मानले जाण्याचा शाप आहे. कालका-शिमला रेल्वे मार्गादरम्यान प्रवास करताना हे रेल्वे स्थानक लागते. या रेल्वेस्थानकाच्या बाजूला एक गुहा आहे. ही गुहा ब्रिटिश इंजिनिअर कर्नल बडोग यांनी तयार केली होती. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली होती. या गुहेत कर्नल बडोग यांचा आत्मा फिरत असतो, अशी एक चर्चा आहे.
💀 नैनी रेल्वेस्थानक
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील नैनी रेल्वे स्टेशनजवळच नैनी जेल आहे. या जेलमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लोक कैद होते. त्यांनी जेलमध्ये प्रचंड अत्याचार आणि यातना सोसल्या होत्या. अनेकांचा त्यातच मृत्यू झाला होता. रेल्वेस्थानक परिसरात त्यांचा आत्मा फिरत असतो, असा दावा तेथील नागरिक करतात.
खरेखोटे भुतालाच ठाऊक
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
======================================
Demon-laden railway stations
___________________________
Mahiti seva Group Pethwadgaon
____________________________
The spread of science in the advanced world has reduced the ‘crazy understanding’ of believing in ghosts, witchcraft and vampires to some extent. The law has made it completely invalid.
The haunted places of ghosts, like their species (where the three roads meet) have their own cemeteries, fallen wells, fallen castles, fallen houses, old trees, Devaraya, towers, forests, water bodies, dam walls, village gates, or river or mountain ghats. Are. Munje, Samandh mainly inhabits trees like Pimpal, Wad, Umber. If such trees are not available, it is believed that they smell on sweet, fragrant trees.
Chittoor railway station-
Andhra Pradesh's Chittoor railway station is one of the most feared railway stations in the country. Citizens living in the vicinity of the railway station claim that a CRPF jawan once alighted from a train in the area. His name was Hari Singh. The jawan was severely beaten by both the RPF and the TTE. He died in the beating. Now Hari Singh's soul is roaming around the railway station for justice, say the locals.
Begunkodar railway station
At Begunkodar railway station in West Bengal's Purulia district, passengers spot a female ghost in a white saree. The station has been closed for 42 years due to claims of ghosts in the station area. This railway station was finally reopened in 2009. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, yet the ghosts in people's minds do not go away.
💀Badog Railway Station-
Even a small and beautiful railway station called Badog in Solan district of Himachal Pradesh is cursed to be considered a ghost station. The railway station is located on the Kalka-Shimla railway line. There is a cave next to this railway station. The cave was built by the British engineer Colonel Badog. He later committed suicide. There is a rumor that Colonel Badog's soul is wandering in this cave.
💀 Naini Railway Station
Naini Jail is located near Naini Railway Station in Prayagraj, Uttar Pradesh. Many people were imprisoned in this prison during the pre-independence period. He was tortured and tortured in prison. Many died in it. The locals claim that their soul is moving in the railway station area.
Only the true ghosts know
MAHITI SEVA Group Pethwadgaon
9890875498