सेक्सटॉर्शन : लोकांना चुना लावुन चुल्हेडा गावातील लोक श्रीमंत होऊ पाहत आहेत

 

लोकांना चुना लावुन  चुल्हेडा गावातील लोक श्रीमंत होऊ पाहत आहेत 


____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________
राजस्थान मध्ये  भरतपूर  जिल्ह्यात चुल्हेडा हे गाव आहे. गाव तस इतर खेडयासारखचं,शेती करावी, गुरेढोरे सांभाळावी  मिळतील तेवढयात चार घास सुखाने खावे. अशी इथली पुर्वापार रीत.पण गावातील नविन पिढिला आधुनिक चटकमटक जीवनशैलीत राहण्याची चटक लागली आणि इतराना फसवून,लुबाडुन येथील लोक धन्यता मानु लागली.साधारण दहा वर्षापूर्वी अगदी गरीब खेडेगावासारखं हे चुल्हेडा गाव होतं. म्हणजेच गावातली घरं साधी दगड मातीची होती. गावातल्या लोकाचं राहणीमान अगदी साधं होतं. वाहनांची संख्या खूपच कमी होती. गेल्या पाच वर्षांत या गावाचा जणू कायापालट होऊ लागला आहे. या गावात बंगला टाईप घरं मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहेत. गाड्यांची वर्दळ वाढली आहे. लोंकाची जीवनशैली सुधारली. या वर्णनावरून, हे गाव विकासाच्या वाटेवर आहे, असं वाटू शकतं. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही.
सुमारे १०००-१५०० लोकवस्तीच्या या गावात केवळ तीन तरुण सरकारी नोकरीत आहेत. एकजण लष्करात आहे, एक पोलिसात आणि एक शिक्षक आहे. बहुतांश लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात किंवा मजुरीवर दगड फोडण्याचं काम करतात. या गावातले अनेक तरुण वाममार्गाला लागले आहेत.लोंकाची आॉनलाईन फसवणूक करणे व सेक्सटॉर्शन करणे हे आधुनिक उपकरणाद्वारे करण्यात या गावातील तरूणांचा कोणी हात धरणार नाही.इंजिनिअर लोंकाना चुना लावतील अशी या गावातील लोंकाची प्रसिद्धी आहे.या गावात मेवाती लोकसंख्या जास्त असून, ते स्वतःला मेव मुसलमान मानतात. गावाच्या लौकिकाबद्दल विचारलं असता, 'पूर्वी ज्या लोकांना घरावर छप्पर घालणं मुश्किल होतं, ते आज घरांवर संगमरवर लावत आहेत. ज्यांना दोन वेळचं जेवणही मिळणं अवघड होतं, ते कोल्ड्रिंकवर पैसा उडवत आहेत. कोणत्याही योग्य मार्गाने अचानक असा पैसा मिळूच शकत नाही,'
पूर्वी पितळेला सोनं सांगून विकण्यासारखे उद्योग केले जायचे. इंटरनेट आल्यानंतर ऑनलाइन, कॅशलेस पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले. आता ते सेक्सटॉर्शनपर्यंत पोहोचलं आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ व्यक्तीने दिली. गावात कोणीही या विषयाबद्दल बोलायला तयार नाही किंवा बोललंच तर स्वतःची ओळख सांगायला तयार नाही. एका दगड फोडणाऱ्या युवकाने सांगितलं, की माझ्या वयाच्या अनेक युवकांनी गेल्या वर्ष-दीड वर्षात मोठी संपत्ती कमावली आहे.

People in Chulheda village are trying to get rich by applying lime ,सेक्सटॉर्शन : लोकांना चुना लावुन  चुल्हेडा गावातील लोक श्रीमंत होऊ पाहत आहेत,


भास्कर'च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी काही लोक वस्तू स्वस्त देण्याची ऑनलाइन जाहिरात देऊन फसवायचे.गेल्या वर्ष-दीड वर्षापासून सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढले आहेत. फसवणुकीच्या प्रकारासाठी पूर्वीपासूनच ही गावं प्रसिद्ध असल्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनी इथल्या बेरोजगार तरुणांना  जास्त पैशांचं आमिष दाखवून या धंद्यात ओढून घेतलं.
🔹 कसे करतात सेक्सटॉर्शन
इंटरनेट ज्ञान असणाऱ्या तरुणांना मोबाइल आणि सिमकार्ड दिलं जातं. ते तरुण कोणत्या तरी तरुणीच्या नावाने खोटी सोशल मीडिया प्रोफाइल्स तयार करतात, फेसबुकवर छान छान सुंदर तरूणीचे फोटो लावुन अनेकांशी सेक्स चॅट करतात.समोरील पुरुष,आपल्याशी तरूणी चॅट करते हे पाहून हुरळुन जातो.फेसबुक,व्हॉटसअप वर गप्पा मारून त्यांना व्हिडिओ कॉल करायला भाग पाडतात.कोणी त्यांच्या या जाळ्यात सापडलंच, तर स्क्रीन रेकॉर्डरच्या सहाय्यानं व्हिडिओ तयार केला जातो.केवळ पुरूषाना नव्हे तर महिलांनाही हे लोक जाळयात आोढतात.नग्न व्हिडिओ,फोटो पाठवण्यासाठी प्रवृत्त करण्याचे विशेष कसब यांचेकडे असते.नंतर दुसऱ्या टीमचं काम सुरू होतं. ती टीम संबंधित व्यक्तीला फोन करून नग्न व्हिडिओ  रेकॉर्ड झाल्याचं सांगते आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करतात. पैसे मागवण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडण्याचं कामही या तरुणांची एक टीम करते. खंडणी वसूल झाल्यानंतर त्यातली २० टक्के रक्कम पहिल्या टीममधल्या तरुणांना दिली जाते. त्यांना बाकीच्या टीम्सबद्दल किंवा किती वसुली झाली याबद्दल काहीच माहिती नसतं.या गावांतल्या बहुतांश तरुणांकडे पहिल्या फळीतलं काम असतं. त्यामुळे पोलीस कारवाई झाली, तर पहिल्यांदा हेच तरुण पकडले जातात. कारण पोलीस हेच नंबर तपासतात. बाकीच्या लोकांविरुद्धचे पुरावे शोधून त्यांच्यावर कारवाई करणं अवघड असतं, असं खोह पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण एकूण प्रकरणांपैकी केवळ १० ते १२ टक्केच प्रकरणांत तक्रारी दाखल केल्या जातात. बाकीच्या राज्यांतल्या काही पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा अशा प्रकरणांत इथल्या पोलिसांची मदत मागितली आहे.आजपर्यन्त किती पुरुष व महिला या सेक्सटॉर्शनला बळी पडले आहेत हे समजायला मार्ग नाही.
पुरूष तर बळी पडतातच पण महिला सुध्दा सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत.महिलांच्या फेसबुक मेसेंजरवर त्याच महिलेचे फोटो मोर्फ करून व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनो, आता अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण न होणे, कमी वयात झालेले घटस्फोट अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत. मात्र, आता महिलाही यात गुरफटल्या जात असून, त्यांनादेखील ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
कसे करतात सेक्सटॉर्शन
एखाद्याला केवळ अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करणे कसे सुरू होऊ शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पोलिस अधिकारी याबाबत सांगतात की, एखाद्या व्यक्तीशी सोशल मीडियावर फेसबुक,व्हॉटसअप वर जवळीक वाढवली जाते. यानंतर त्याला व्हिडिओ कॉलवर येण्यास उद्युक्त केले जाते. रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडिओ अशा प्रकारे प्ले केला जातो जेव्हा जेव्हा एखादा माणूस व्हिडिओ कॉलवर दिसतो तेव्हा लाइव्ह वाटेल.अशा पध्दतीने केला जातो. पॉर्न व्हिडिओ चालू असताना कॉलवर उघडे झालेल्या व्यक्तीला,गोड बोलुन  कपडे उतरवण्यास सांगितले जाते आणि नंतर त्याचा / तिचा स्क्रीन रेकॉर्ड केला जातो. नंतर तोच रेकॉर्ड स्क्रीन त्या व्यक्तीकडे पाठवुन पैशाची मागणी केली जाते. आणि ब्लॅकमेलिंगची साखळी सुरू होते.हे एवढयावरच थांबत नाही.अब्रूच्या भितीने अनेकजण लुटले जातात.काहीजणानी यातुन आत्महत्या सुध्दा केल्या आहेत.
सोशल मीडियावर सावधान राहण्याची गरज
सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून मुलींचा फोटो वापरून बनावट अकाउंटवरून आपल्या सोबत मैत्री करून व्हॉट्सऍपद्वारा किंवा फेसबुक मेसेंजरद्वारा व्हिडिओ कॉल केला जातो.मेसेज, ईमेल आदींवर प्राप्त होणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, स्वत:ची वैयक्तिक माहिती देऊ नये.

महिलानिही आपले वैयक्तिक फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताना भान ठेवावे.
-माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498


__________________________________________

People in Chulheda village are trying to get rich by applying lime 


 ____________________________

 Mahiti seva Group Pethwadgaon

 ____________________________

 Chulheda is a village in Bharatpur district in the Indian state of Rajasthan.  The village, like any other village, should cultivate, take care of cattle and eat as much grass as it can.  But the new generation in the village has become accustomed to living a modern lifestyle and by cheating others, the people of Lubadun have come to be blessed. About ten years ago, it was a very poor village like Chulheda.  That is, the houses in the village were of simple stone clay.  The standard of living of the villagers was very simple.  The number of vehicles was very low.  The village has undergone a transformation in the last five years.  Bungalow type houses are appearing in large numbers in this village.  The rush of trains has increased.  Lonka's lifestyle improved.  From this description, it may seem that the village is on the path of development.  But that is not really the case.

 In this village of about 1000-1500 population, only three young people are in government service.  One is in the army, one is in the police and one is a teacher.  Most people work as drivers or stonemasons for wages.  Many youngsters from this village have taken to the left. No one will touch the youngsters of this village to cheat and seduce them online with the help of modern equipment.  .  When asked about the folklore of the village, 'People who used to find it difficult to put a roof on their houses are now putting marble on their houses.  Those who find it difficult to get even a two-course meal are spending money on cold drinks.  There is no right way to get such money all of a sudden, '

 In the past, brass was sold as gold.  With the advent of the Internet, online, cashless forms of gangsterism began.  Now it has reached sextortion, said a senior person.  No one in the village is ready to talk about this issue or even identify himself.  "Many young people my age have made a fortune in the last one-and-a-half years," said one stone-throwing youth.

 According to Bhaskar's report, in the past, some people used to be deceived by online advertisements for cheap goods. Over the last one-and-a-half years, the incidence of sextortion has increased.  Since the village has long been known for its forms of fraud, outsiders lured unemployed youths into the business by offering them more money.

 🔹 How to do sextortion 

 Mobile and SIM cards are given to young people with internet knowledge.  They create fake social media profiles in the name of a young woman, post photos of beautiful young women on Facebook and have sex chats with many people. The men in front of them get excited when they see a young woman chatting with you. They chat on Facebook and WhatsApp and force them to make video calls.  Once someone is caught in their trap, the video is created with the help of a screen recorder. Not only men but also women are caught in the trap. They have the special skill of motivating to send nude videos and photos. Then the work of the other team starts.  The team calls the person concerned and tells them that the nude video was recorded and collects the ransom by threatening to make the video viral.  A team of these youths also open bank accounts on the basis of fake documents to solicit money.  After the ransom is collected, 20% of the amount is given to the first team youth.  They have no idea about the rest of the teams or how much was recovered. Most of the youngsters in this village have a first-class job.  So if there is a police action, this is the first time these youngsters are caught.  Because that's what the police check.  It is difficult to find evidence against the rest of the people and take action against them, said Khoh police station officials.  This is because only 10 to 12 per cent of the total cases are reported.  Some police in the rest of the states have repeatedly sought the help of local police in such cases in the last few months.

 Men are the victims, but women are also the victims of sextortion.  Therefore, women, now the police department is appealing not to accept stranger friend requests. Some people in the society are falling prey to sextortion due to marital discord, unfulfilled sexual expectations from the spouse, early divorce.  However, now women are also getting involved in it and they are also being blackmailed.

 How to do sextortion 

 How can someone start blackmailing you with just a pornographic video call?  You may have had such a question.  Police officials say that intimacy with a person is enhanced on social media, Facebook and WhatsApp.  He is then prompted to make a video call.  Recorded pornographic videos are played in such a way that when a person appears on a video call, it feels live.  While the porn video is playing, the person exposed on the call is asked to undress sweetly and then his / her screen is recorded.  The same record screen is then sent to the person asking for money.  And the chain of blackmailing starts. It doesn't stop there. Many are robbed for fear of disgrace. Some have even committed suicide.

 Need to be careful on social media 

 Video calls are made through WhatsApp or Facebook Messenger by befriending them from fake accounts using photos of girls through various means of social media. Do not click on the links received on messages, emails etc., do not give your personal information.  Be aware.

Women should also be aware when posting their personal photos and videos on social media.

 -mahiti seva Group Pethwadgaon

 9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম