महिलांसाठी दिलासादायक बातमी: रात्री-बेरात्री काही अडचण असल्यास मदतीसाठी हा नंबर डायल करा

 महिलांसाठी दिलासादायक बातमी: रात्री-बेरात्री काही अडचण असल्यास मदतीसाठी हा नंबर डायल करा


रात्रीच्या वेळेस विशेषतः महिला एखाद्या शहरात उशीरा रेल्वे किंवा एस टी बस  आल्यास तिला वाहन मिळत नाही,किंवा काही इतर अडचण आली किंवा कोणी समाजकंटक त्रास देत असल्यास तिला मदतीची गरज असते.आता एक दिलासादायक घटना समोर आली आहे. रात्री-अपरात्री अडचणीत असलेल्या महिलांना लगेचच मदत मिळणं सोपं होणार आहे. महिलांसाठी 24 तास काम करणार राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांना तक्रार नोंदवता येणार आहे. केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते २७ जुलै २०२१ रोजी महिलासांठी २४ तास ७ दिवस सुरू असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

महिलांसाठी दिलासादायक बातमी: रात्री-बेरात्री काही अडचण असल्यास मदतीसाठी हा नंबर डायल करा

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल महिलांना दिवस-रात्र माहिती देण्याची सेवा उपलब्ध व्हावी, तसेच महिलांना त्यांच्या तक्रारी मांडता याव्यात हा या हेल्पलाईनचा मुख्य उद्देश आहे. महिलांना गरज असल्यास हेल्पलाईनमधील तज्ज्ञ सल्लाही देणार आहेत. ही हेल्पलाईन पोलीस, हॉस्पिटल्स, जिल्हा सेवा प्राधिकरण, मानसशास्रज्ञ यांच्याशी जोडण्यात येणार आहे.

त्यामुळे ही हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार आहे. देशातील कोणतीही महिला आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल 

📞 हेल्पलाईन क्रमांक 7827 170 170 

या नंबरवर फोन करून आपली तक्रार नोंदवू शकते. ही हेल्पलाईन २४ तास सुरू असेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना वेळेवर माहिती आणि मदत पुरवली जाईल, असं राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या www.ncw.nic.in या वेबसाईटच्या माध्यातूनही महिला आपल्या तक्रारी नोंदवू शकतात

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম