ग्रीन टी नव्हे,तर हा आहे "निळा चहा"
आपल्या भारतात चहाचे शौकीन कमी नाहीत. दिवसाची सुरूवात ही चहानेच होते.उत्साहवर्धक पेय म्हणुन चहाकडे पाहिले जाते.चहा जितका चांगला तितकाच तो आरोग्याला अपायकारक आहे.हे आपण जाणतोच.निळा चहा
या चहावर उतारा म्हणुन की काय, मध्यंतरी "ग्रीन चहा" "लेमन टी" आला.पण चहा शौकीन याकडे आंबट चेहरा करून पाहतात.कारण ग्रीन चहा आरोग्य वर्धक असला तरी खरया चहाची चव याला येत नाही अशी यांची गोड तक्रार असते.तर काहीनी हा ग्रीन चहा आत्मसात केला आहे.गोकर्णीचे फुल
आता तर फुलापासून तयार झालेला "निळा चहा" आला आहे.हा चहा "अपरिजिता" या फुलापासून पासुन तयार केला जातो."अपराजिता" ला दुसरे नाव गोकर्ण असे आहे. या चहाचा रंग निळा असल्याने या चहाला "निळा चहा"म्हणतात.याची चव ग्रीन चहा, लेमन टी पेक्षा वेगळी आहे.हा चहा आपल्याला घरी तयार करता येतो यासाठी गोकर्णाची(अपराजिता) ताजी फुलं धुऊन घ्यावीत. ती कपभर गरम पाण्यात टाकावीत आणि ढवळावीत. हळूहळू पाण्याला निळा रंग येऊ लागतो. ज्यांना गोड आवडतं, त्यांनी थोडी साखर टाकली तर हरकत नाही. नाहीतर तो अगोड तसाच प्यायला तरीही चालतो. या चहाला एक वेगळा सुंगध आहे.गोकर्णाच्या फुलांमध्ये रक्त शुद्ध ठेवणारी काही रसायनं असतात. त्यामुळे हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चहा खूप फायदेशीर मानला जातो. दिवसाची सुरुवात एक कप निळ्या चहाने केली तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवत नाही.हा चहा प्याल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकली जातात.त्याचबरोबर डेोळ्यासाठी हा चहा गुणकारी आहे.हा चहा प्यायल्याने दृष्टी वाढू शकते. जर लहान वयात मुलांना चष्मा लागला असेल तर त्यांनी या चहाचे सेवन जरुर करावे.थकवा, जळजळ आणि डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी या चहाचे सेवन लाभदायक आहे.या चहाने ज्याना शुगरचा त्रास आहे त्यांना साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत करतो.त्याचबरोबर ज्या महिलांची मासिक पाळी नियमित येत नाही त्यांना हा निळा चहा घेतल्याने निश्चितच फरक पडतो.
त्याचबरोबर निळ्या चहामध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्याने केस व त्वचेसाठी सुध्दा हा चहा चांगला आहे. ब्लू टीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात या व्यतिरिक्त अशीही खनिजे आहेत ज्यामुळे त्वचेशी संबंधित आजारही दूर करतात.
शिवाय ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी देखील हा चहा नियमित पिल्यास नैसर्गिक रित्या कॅलरी बर्न होतात.यासह शरीराची चयापचय देखील सुधारते फॅटी यकृत बरे करण्यास ब्लू टी फायदेशीर आहे.रोज एक कप "ब्लू टी" पिणे खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते हे यकृत मूत्रपिंड पोट आणि आतडे स्वच्छ करते ब्लू टी एक अँटीऑक्सिडेंट दाहक विरोधी आणि नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे यामुळे शरीराची संपूर्ण स्वच्छता होते शरीराच्या अंतर्गत अवयवांची स्वच्छता म्हणजे शरीर बर्याच रोगांपासून संरक्षित आहे म्हणून हा चहा अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
गोकर्ण फुलाबद्दल:
गोकर्णी किंवा गोकर्ण ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात म्हणून ही या नावाने ओळखली जाते. ही वनस्पती पारदबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या ६४ वनस्पतींपैकी एक आहे.
गोकर्णीच्या फुलांचा रंग सामान्यत: गडद निळा किंवा पांढरा सफेद असतो. परंतु फिकट निळा, फिकट गुलाबी या रंगांची फुले असलेली गोकर्णीदेखील आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात.
गोकर्णाची वेल आधार घेत वर वर चढते. बाल्कनीमधील ग्रिलवर किंवा कुंपणावर सहज आपला जम बसवते.