दारू चढली की माणुस इंग्लिश का बोलतो?

 दारू चढली की माणुस इंग्लिश का बोलतो ?


लोक दारू का पितात? दारू पिणे चांगले की वाईट? हा आपला विषय नाही,यात गरीब किंवा श्रीमंत असा फरक नसून फरक वृत्तिचा आहे असे मला वाटते.गरीब लोकं दारू पिऊन झोकांड्या खात फिरतात, गटारात पडतात आणि श्रीमंत लोकं आलिशान इंपोर्टेड गाड्यांमधून गरीब लोकांना चिरडतात.

दारू चढली की माणुस इंग्लिश का बोलतो?

दारू कोणतीही असो, कोणीही प्यायलेली असो, ती मर्यादेच्या बाहेर गेली की उपद्रव देणारच.खरी समस्या ही आहे कि लोकांना कुठं थांबायचं हेच कळत नाही यामुळे तोल सुटतो,भान सुटते व माणुस जंगली वागतो.थोडकयात काय तर,सामान्य माणसं देशी पितात,पांढरपेशा वर्ग दारू पित नाही तर ते  " ड्रिन्क्स घेतात".ही वर्गवारी कोणी केली?

माणुस मग त्याची मातृभाषा कोणतीही असो,त्याला दारू चढली की तो परकीय इंग्लिश भाषा बोलु पाहतो.हे चित्र भारतात तरी आहे.मानसशास्त्र नजरेतुन पाहिले असता शास्त्रज्ञ म्हणतात की,कोणतीही परकीय भाषा बोलायची म्हंटलं की,आपल्या मनात एक संकोच,चूक,भिती,बुजरेपणा  बोलण्याची भीती असते. दारू तुम्हाला अशा मनस्थितीत नेऊन ठेवते जिथे तुमच्या मनातील सर्व संकोच,भीती,बुजरेपणा नाहीशी झालेली असते.इंग्रजीत बोलण्याची सुद्धा. म्हणून इतर वेळी इंग्रजीत न बोलणारी व्यक्ती त्यावेळी अगदी आत्मविश्वासाने इंग्रजीत बोलत असते.” शिवाय त्याच्या मनात एक गोष्ट घर करून राहिलेली असते की, इंग्रजी ही प्रतिष्ठीत आहे व उच्च लोक ही भाषा बोलतात.मग आपण का बोलु नये?इतर वेळी मात्र तो इंग्रजी बोलताना अडखळेल पण दारू चढली की,मी इंग्रजी बोलु शकतो,मी पण इतरासारखा उच्च आहे हे दाखवणयाचा त्याचा प्रयत्न असतो.कारण त्याच्या सुप्त मनात ही गोष्ट ठासुन भरलेली असते. दारू चढल्यावर ‘कॉग्नेटिव्ह’ म्हणजेच संज्ञानात्मक संवेदना या अल्कोहोलमुळे जागृत होतात.असे शास्त्रज्ञ म्हणतात.

पण दारू पिल्यानंतर प्रत्येकजण असेच वागेल असे नाही कारण प्रत्येकाची आकलनशक्ती वेगवेगळी असते.

जे लोक इतरवेळी सगळयासमोर गाणी म्हणत नाहीत,नाचत नाहीत ती लोक दारू चढल्यानंतर मात्र सुसाट वागुन आपणसुद्धा कुठे कमी नाही हे दाखवून देतात.

आणि हाच प्रकार इंग्रजी बोलणयाच्या बाबतीत होतो.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম