आौषध लिहुन देताना डॉक्टर "Rx" का लिहितात

 आौषध लिहुन देताना डॉक्टर "Rx" का लिहितात.


आपण कधी ना कधी डॉक्टर कडे जातो.त्यावेळी डॉक्टर आपली तपासणी करतात.रोगाचे निदान करून झाल्यावर डॉक्टर आपणास काही आौषधे लिहुन देतात जी आपणास मेडीकल मधुन खरेदी करायची असतात.

आौषध लिहुन देताना डॉक्टर "Rx" का लिहितात

आौषध लिहुन देताना डॉक्टर "Rx" का लिहतात

ही आौषधे लिहुन दिलेला कागद जर तुम्ही बारकाईने पाहिला असेल तर तुम्हाला हे दिसुन येईल की,डॉक्टर आौषधे लिहुन देताना सुऱूवातीला Rx असे लिहुन मग खाली गोळ्या,सिरप,कॅप्सूल ही आौषधे लिहुन देतात.

हे का लिहिले असते हे सामान्य माणसाला समजत नाही व मेडिकल दुकानदारही याबद्दल काही सांगत नाही. Rx हे का लिहितात हे बरयाच डॉक्टराना देखील माहिती नसते.वैद्यकीय क्षेत्रामध्ये Rx याचे दोन अर्थ होतात

१) वैद्यकीय क्षेत्रात प्राचीन काळात मोठे योगदान असलेल्या इजिप्तमधील होरस नावाची देवता होती. या देवीचे डोळे हे आरएक्स या चिन्हासारखे भासतात. हे डोळे आरोग्याचे प्रतिक असल्याचे येथील लोक मानतात. म्हणूनच डॉक्टर प्रिस्किप्शनवर आरएक्स लिहितात, असे म्हटले जाते."आर" अक्षराच्या उजव्या पायावर एक रेषा ठेवून "आरएक्स" (Rx)चिन्ह तयार केले जाते. लॅटिन शब्द Recipere किंवा Recipe याचे Rx हे संक्षेपाक्षर आहे.Rx ह्याचे लॅटिन भाषेत take though (टेक दाउ)म्हणजे you take (हे घ्या)असा अर्थ होतो.

२) Rx  हे लॅटीन भाषेतील एक चिन्ह असून त्याचा इंग्रजीमघ्ये टेक आणि मराठीत घेणे असा अर्थ होतो.इंग्रजीत याला प्रिस्क्रीप्शन prescription म्हणतात.

इजिप्तमधील वैद्यांनी औषधांच्या चिठ्ठीवर 'Rx' चिन्ह लिहायला सुरुवात केली. त्यानंतर इतरांनी याचं अनुकलन केलं आणि 'Rx' लिहिण्याची पद्धत सर्वदूर पसरली.म्हणुन जगातील सर्व डॉक्टर रूग्णाना आौषध लिहुन देताना कागदावर सुरूवातीला Rx असे लिहितात. (हल्ली प्रिन्ट काढलेल्या कागदावर सुध्दा) 

 Rx शिवाय डॉक्टरांकडून मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर इतरही काही कोड किंवा शॉर्टकट लिहिले जातात.पण सर्वच डॉक्टर हे कोड लिहित नाहीत. हे कोड औषध कधी घ्यावे याबाबत असतात. औषध दिवसातून किती वेळा औषध घ्यावे? जेवणापूर्वी घ्यायचं की जेवणानंतर?हा तपशिल असतो.ते कोड पुढीलप्रमाणे आहेत. 

SOS : आवश्यकतेनुसार किंवा गरज भासल्यास

TID : दिवसातून तीनदा 

QID : दिवसातून चार वेळा 

qH : दर तासाला 

qOD : एक दिवसाआड

AC : जेवणापूर्वी 

PC : जेवणानंतर 

OD : दिवसातून एकदा 

BT / HS : झोपण्याच्या वेळी 

BBF : नाश्ता करण्यापूर्वी 

BD : रात्रीच्या जेवणापूर्वी 

Tw : आठवड्यातून 2 वेळा 

QAM : दररोज सकाळी 

QPM : दररोज रात्री 


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম