बिनसोंडेचा गणपती

 बिनसोंडेचा गणपती


तुम्हाला गणपती म्हटले की मनासमोर येते ती गजमुख असलेला व सोंड असलेला गणपती.गणपतीला आपण नेहमी सोंडेच्या रूपातच पाहत व भजत असतो. पण भारतात जयपुर (राजस्थान) येथे असे एक मंदिर आहे की या गणपतीला सोंड नाही.या मंदिरात गणेशाच्या बालरुपाची पूजा केली जाते.मंदिरात उंदरांच्या दोन मोठ्या प्रतिमा बसविल्या गेल्या असून दर्शनांसाठी येणारे भाविक त्यांच्या मनोकामना या उंदरांच्या कानात सांगतात.हे मंदिर आरवली पर्वताच्या रांगामधील एका उंच डोंगरावर असून सुमारे ५०० मीटरची चढण त्यासाठी चढावी लागते.

बिनसोंडेचा गणपती

येथुन जयपूर शहराचे विहंगम दृश्य दिसते.

 जयपूरचे राजे सवाई जयसिंग द्वितीय यांनी हे मंदिर बांधले आहे. त्यांनी या पहाडाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळी तांत्रिक विधीने या मंदिराची स्थापना केली असे सांगतात. गणेश चतुर्थीच्या दुसरे दिवशी येथे मोठी गर्दीअसते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे जयपूरचा राज परिवार ज्या महालात राहतो, त्या चंद्रमहालाच्या वरच्या मजल्यावरून मंदिरातील मूर्तीचे दर्शन घडते.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম