मानवी चेहरयाचा गणपती

 मानवी चेहरयाचा गणपती


जन्मापासून आपली पहिली ओळख होते ती ' बाप्पा मोरया ' शीच! लौकीक जीवनातील विद्याभ्यासाची सुरुवातही ' श्रीगणेशा ' नेच होते. हा गणेश आहे शिव आणि पार्वतीचा पुत्र. शिव म्हणजे सौंदर्य , मांगल्य , पावित्र्य आणि पार्वती म्हणजे शक्ती.गणपती म्हटले की त्याला हत्तीचे तोंड असते म्हणुन तर त्याला "गजवदन" म्हणतात. भारतातच नव्हे  तर जगात जेवढी गणेश मंदिर आहेत तेथे गणपतीला हत्तीच्या तोंड असलेल्या रूपातच ही मंदिरे आहेत. पण तामिळनाडू मधील "तीलतर्पणपुरी" गावात गणपतीचे मंदिर असुन तेथील गणपतीला मानवी चेहरा आहे.गणेशाला हत्तीचे मुख मिळण्यापूर्वी गणेशाचे रूप ही मूर्ती दर्शविते.

मानवी चेहरयाचा गणपती
श्रीराम जेव्हा दशरथाच्या पिंडांना दान देत होते तेव्हा पिंडाचे किडे होऊ लागले. श्रीरामाने यावर उपाय शोधण्यासाठी शिवाची उपासना केली तेव्हा शिवाने मंथखनम (तीलतर्पणपुरीचे प्राचीन नाव) येथे जाऊन पिंडदान करण्यास सांगितले. तेव्हा राम येथे आले आणि त्यांनी पिंडदान केले तेव्हा त्या चार पिंडांची चार शिवलिंगे बनली. या ठिकाणी श्रीरामाने त्यांच्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून पूजा केली होती.

या गावाला "तीलतर्पण" का म्हटले जाते तर .तीलतर्पणचा अर्थ म्हणजे पूर्वजांना समर्पित केलेले. पुरी म्हणजे नगर.

यामुळे भाविक येथे पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा करतात.हे मंदिर याच कारणासाठी प्रसिद्ध आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম