चलनी नोटामध्ये धातुचा धागा का वापरतात?

 चलनी नोटामध्ये धातुचा धागा का वापरतात?


चलनातल्या दर दहा लाख नोटांमध्ये २५० खोट्या नोटा आढळतात आणि एकूण चलनात कोणत्याही वेळी ४०० कोटी रुपयांच्या (सुमारे ०.०२८टक्के) खोट्या नोटा आढळत असल्याचं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचा हवाला देऊन ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने २०१६ सालच्या मे महिन्यात म्हटलं आहे. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे आणि तेवढा आधार दहशतवादी गटांना पुरणं केवळ अशक्य आहे. खोट्या नोटांचा तो आधार महत्त्वाचा नसून त्यापायी अनेकदा शासनाची पारदर्शकता धुळीस मिळते, हा धोका मोठा आहे.हा सर्व विचार करून नोंटाची जास्ती जास्त सुरक्षा कशी करायची याचे धोरण "रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया" आखत असते.त्यातीलच एक प्रकार म्हणजे नोटेतील धागा होय.

चलनी नोटामध्ये धातुचा धागा का वापरतात?

आपण दररोज अनेक प्रकारच्या नोटा हाताळत असतो.या नोटा हाताळत असताना आपले केव्हातरी नोटामध्ये असणाऱ्या उभ्या चकाकत्या रेषेवर गेले असेलच.तर हाच नोटामधील "धातुचा धागा" होय.यालाच मेटेलिक धागा म्हणतात.

नोटेच्या मेटेलिक धाग्याचा उपयोग हा सुरक्षेच्या कारणासाठी सुरु केला गेला होता. त्याच्यावर काही कोड लिहीलेले असतात. नोटांमध्ये मेटेलिक दोऱ्याचा उपयोग करण्याची कल्पना सर्वात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये १८४८ साली आली होती. परंतू याला वापरात आणण्यासाठी द इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी म्हणजे (IBNS)नुसार नोटांमध्ये धातुच्या धाग्याचा वापर हा सर्वप्रथम बँक ऑफ इंग्लंडने २० पाऊंडच्या नोटेवर मेटलच्या धागा वापरला होता.यानंतर इतर देशही आपल्या नोटामध्ये याचा वापर करू लागले.हळुहळु यात सुधारणा होत गेली व मेटलच्या जागी प्लास्टिकची स्ट्रीप वापरणं सुरु केलं. मेटेलिक स्ट्रिप ही लाल आणि सिल्वर रंगाची होती. मेटेलिक स्ट्रिपचा वापर नोटांच्या आत केला जायचा. याला प्रकाशात बघितले तर स्ट्रिप चमकताना दिसते.जगातील काही मोजक्याच कंपन्या मेटेलिक स्ट्रिप बनवतात. परंतु भारतात नोटांवर असणारी मेटेलिक स्ट्रिप ही विदेशातून मागवली जाते.सन २००० मध्ये भारतात रिजर्व बँक ऑफ इंडियाने एक हजार रुपयांची नोट जारी केली, त्यामध्ये प्लास्टिकची स्ट्रीप वापरली गेली.नंतर ५,१०,२० व ५० ,१०० रूपयाच्या नोटामध्ये देखील याचा वापर होऊ लागला.नंतर अनेक देशांनी आपल्या चलनी नोटांची सुरक्षा अधिक मजबूत बनविण्यासाठी मेटल आणि प्लास्टिक स्ट्रिप त्यावर काही नंबर किंवा अक्षरे घालून नोटे मध्ये बसविण्याची पद्धत विकसित केली व त्याचा वापर वाढला.. ही स्ट्रिप अतिशय पातळ आणि धातू किंवा प्लास्टिक पासून बनविली जाते. ही स्ट्रिप खास तंत्रज्ञान वापरून नोटे मध्ये प्रेस केली जाते. भारतात सन २००० मध्ये रिझर्व्ह बँकेने १०००  रुपये मुल्याची नोट चलनात आणली.त्यावेळी त्यात ब्रोकन मेटेलिक स्ट्रिप आणि त्यावर हिंदी मध्ये भारत आणि "आरबीआय" ही अक्षरे घातली गेली. नंतर २००० च्या नोटेवर सुद्धा अशीच अक्षरे उलट्या क्रमाने होती. पुढे ५००,१०० च्या नोटांमध्ये त्याचा वापर सुरु झाला. आता तर ५,१०,२० आणि ५०,१००,२०० च्या नोटांवर सुद्धा अशी स्ट्रिप आहे.

१९३५ मध्ये मध्यवर्ती बँक म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेची स्थापना झाली आणि नोटा छपाईचे अधिकार रिझव्‍‌र्ह बँकेकडे आले. तेव्हापासून चलनी नोटांच्या छपाईची जबाबदारी रिझव्‍‌र्ह बँकेवर आहे. १९३८ मध्ये भारतात १०,००० रुपये मूल्याच्या चलनी नोटांची छपाई करण्यात आली होती.रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटांच्या छपाईवर नियंत्रण ठेवले जाते. नोटांची किती छपाई करायची याचे प्रमाण महागाई, एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर (विकासदर) यांसारख्या घटकांवर अवलंबून आहे.

 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম