या गावात आहे गणपतीची निद्रिस्त मुर्ती
आौंरगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद येथे निद्रिस्त स्वरूपात हनुमानाचे मंदिर आहे अगदी तसेच गणपतीचे एक मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे या गावी आहे.महाराष्ट्रात असे हे एकमेव मंदिर आहे.
निद्रिस्त स्वरूपातील मुर्तिचे मंदिर सहसा कोठे आढळत नाहीत. पण या दोन गावात मात्र आढळतात.(आौंरगाबाद जिल्ह्यातील उपळा या गावी पण निद्रिस्त शंकरावर काली माता आहे) तो लेख नंतर पाहु.
अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे गावात सुमारे ५०० वर्षापुर्वी दादोबादेव नावाचे एक गणेशभक्त राहत होते.ते तन्मयतेने गणेशाची आराधना करीत असत.त्यांची मोरगावच्या मोरया गोसावी गणेशावर श्रध्दा होती.ते दरवर्षी न चुकता मोरगावची वारी करत.त्यावेळी ही वारी पायीच असे.होता होता त्यांचे वय झाले वारी निभवेना.एकवर्षी तर पावसाळ्यात ते मोरगावला जायला निघाले तत्पुर्वी आदल्या रात्री त्यांना स्वप्न पडले की,त्यांनी आता ही वारी थांबवावी. पण त्यांनी ते न जुमानता दुसरया दिवशी मोरगावची वाट धरली.दजलमजल करत ते पायी मोरगावला निघाले. वाटेत एक आोढा लागला, आोढयाला प्रचंड प्रमाणात पाणी होते.पण न डगमगता ते प्रवाहात गेले व पाहता पाहता गंटागळ्या खात कोठेतरी बेट सद्रूश्य जागी येऊन पोहोचले.त्यावेळी त्यांना गणपतीचा द्रूष्टांत झाला की, तु मागे गावाकडे जा, मीच तुझ्या गावी येत आहे.
लागलीच दादोबादेव यांनी इश्वरच्छा प्रमाण मानुन आपल्या गावी माघारी आले.नंतर काही काळातच त्यांचे निधन झाले.
एकेदिवशी त्यांच्या शेतात त्यांचा मुलगा गणोबादेव हे नांगरत असताना त्यांच्या नांगराच्या फाळास काहीतरी टणक वस्तू लागली व नांगर थांबला.
नांगर थांबला म्हणुन त्यांनी गावकरयाना बोलावुन ती वस्तू बाहेर काढली तर ती गणपतीची मूर्ती होती.मुर्तीवर नांगर लागलेली खुण पण स्पष्ट दिसत होती.
लागलीच गावकरयाना घेऊन त्यांनी ती मुर्ती तेथेच स्थापना करून त्यावर मंदिर बांधले.सभामंडपातून आत मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर सुमारे चार फुट लांब,तीन फुट रुंद,दोन फुट खोल अशा हौदात निद्रिस्त स्वयंभू गणपती ची मूर्ती पाहायला मिळते.गाभारयात जमिनीच्या दोन फुट खाली ही मुर्ती आहे.भक्त लोक वरून गुलाल, अष्टगंध टाकतात म्हणुन त्यावर आता अलिकडे काचेचा दरवाजा लावला आहे.आज या गणपतीला लाखो भाविक येऊन दर्शन घेतात.कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी मंदिर बांधकामासाठी देणगी व जमिनी दिल्या आहेत असे म्हटले जाते पण याला पुरावा नाही.
देशातील एकमेव निद्रिस्त रूपातील गणपती म्हणुन या मंदिराची ख्याती आहे.