आता येणार शाकाहारी चिकन

आता येणार शाकाहारी चिकन


जगात लोकसंख्या जेवढया प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात जमिन वाढत नसते,परिणामी मानवाला खाद्य कमी पडता कामा नये.म्हणुन जगभरात शास्त्रज्ञ नवनविन खाद्य शोधत असतात.अमेरिकेत एका प्रयोगशाळेत शाकाहारी चिकन तयार करण्यात आले असुन ते मांसाहारी गटात मोडत नाही, तर ते वनस्पतीजन्य चिकन आहे.यामध्ये मांसाचा तीळभरही वापर केला जात नाही.हे शाकाहारी चिकन तयार करणेसाठी आवश्यक ‘प्रथिने’ ही वाटाणे, मूग, वाल आणि ब्राऊन राईस पासून मिळवली असतात. तर ‘चरबी’ ही कोकोआ बटर, नारळाचे तेल आणि एक्स्पेलर-प्रेसिड कॅनोला ऑईलमधून मिळवले जातात. ‘मिनरल्स’साठी कॅल्शियम, लोह, मीठ आणि पोटॅशियम क्लोराईडचा वापर केला जातो.तर हुबेहूब चिकन दिसण्यासाठी ,चव येण्यासाठी आणि रंगासाठी बीट रसाचा तसेच सफरचंदाच्या अर्काचा वापर करतात. ‘कार्बोहायड्रेटस्’साठी कंपनीने बटाटा स्टार्च आणि मिथाईल सेल्युलोजचा वापर केला आहे. या शाकाहारी चिकनमध्ये वनस्पती जन्य आधारित मीटबॉल, बर्गर पॅटिस आणि सॉसेजचा समावेश केला आहे.अमेरिकेतील ‘बियाँड मीट्स" या प्रसिद्ध कंपनीने हे शाकाहारी चिकनची विक्री करण्याय सुरूवात सुध्दा केली आहे.

आता येणार शाकाहारी चिकन


याचबरोबर सर्वच लोकांना मांसाहारी जेवण आवडते असे नाही.जगातील ३८%लोक अजुनही शाकाहारी जेवणालाच पंसदी देतात.भारतासारख्या देशात तर काही धार्मिक परंपरेनं मांसाहार निषिद्ध मानला जातो.

सन २०५० पर्यंत अशा कृत्रिमरीत्या विकसित केलेल्या मांसाची आहारासाठीची विक्री ६० टक्क्यांपर्यंत वाढेल. ती पर्यावरणासाठीही एक चांगली बाब असेल.भविष्यात प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या विकसित केलेल्या मांसाचा जेवणासाठी वापर मोठ्या प्रमाणात होईल व अन्नासाठी प्राण्यांची हत्या करणे कमी होईल.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম