विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर का बसतात पक्षी ?



  विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर का बसतात पक्षी  ?  


____________________________

   http://bit.ly/36lEteY

  .         नेहमी आपण पक्षांना विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसलेले पाहत असतो. लहानग्यापासून ते अबाल वृद्धापर्यंत प्रत्येकाला असे तारेवर बसलेले पक्षी पाहताच प्रश्न पडत असतो की, हे पक्षी असे का बसतात. या पक्षांना तारेवर बसलेले पाहून आपण त्याला तारेवर पक्षांची शाळा भरते असे म्हणतो. इतक नव्हे तर  लहानग्यांनादेखील मोठ्या व्यक्ती तसेच सांगतात. पण यामागचे खरे कारण काय आहे जाणून घेऊयात...

विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर का बसतात पक्षी  ?

➰ पक्षांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या अमेरीकेतील Audubon Vermont या संस्थेच्या व्यवस्थापक मार्क ला बार यांनी म्हटले आहे की, पक्षी तारेवर बसण्याचे कारण अनेक आहेत. पहिले कारण असे की, शिकार करणारे पक्षी तारेवर बसुन झाडांवर बसलेल्या पक्षांवर नजर ठेवत असतात. दुसरे कारण म्हणजे स्थलांतरित होण्यापूर्वी तारेवर पक्षी एकत्र येतात. खरंतर उन्हाळा संपल्यानंतर हिवाळा ऋुतू सुरू होण्यापूर्वी अधिक पक्षी तारेवर बसलेले पाहायला मिळतात.

➰अमेरीकन शास्त्रज्ञ्यांच्या मते काही वेळा पक्षी जोडीदार निवडण्यासाठी तारेवर बसतात. अनेक वेळा नर पक्षी मादेला आकर्षित करण्यासाठी तारेवर बसून आवाजाद्वारे प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या अर्थाने तार ही पक्षांसाठी कपल्स पॉईंट ठरतात असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे यापुढे कधी पक्षांना तारेवर बसल्याचे पाहिल्यानंतर असे गृहित धरू नका की, ते बिनकामाचे बसले आहेत.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম