हेल्थ कार्ड काढले की नाही? तर असे काढा १० मिनिटात हेल्थ कार्ड
पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात केली.15 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून या मिशनच्या पायलट प्रोजेक्टची नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. या अंतर्गत, एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, जो डिजिटल आरोग्य इको सिस्टिमअंतर्गत इतर आरोग्याशी संबंधित पोर्टलच्या परस्पर संचालनाला सुद्धा सक्षम करेल. हे मिशन सामान्य माणसांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी एक युनिक हेल्थ कार्ड तयार करेल.
डिजिटल आरोग्य मिशनमध्ये प्रत्येक व्यक्तीला 14 क्रमांकांचा एक युनिक हेल्थ आयडी दिला जाईल. हा क्रमांक संबंधित व्यक्तीला हेल्थ आयडी असेल. व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती जसे की रक्त चाचणी,एक्स रे रिपोर्ट,व इतर रोगाशी संबंधित सर्व रिपोर्ट यामध्ये असेल.या कार्डमध्ये संबंधित रुग्णाच्या प्रत्येक चाचणीचा, प्रत्येक आजाराचा तपशील, ज्या डॉक्टरांना ते दाखवण्यात आले आहे,त्याने घेतलेली औषधे आणि निदान यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असेल.यामुळे संबंधित रूग्ण पुढील वेळेस कधीही उपचारासाठी आला तर डॉक्टरला त्याचा मागील सर्व आरोग्य इतिहास समजुन पुढील उपचारासाठी मदत होणार आहे.
हेल्थ कार्ड कसे काढायचे?
मोबाईल वर काढायचे असेल तर मोबाईलवर आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हे अॅप डाऊनलोड करावे.
त्याची लिंक-https://play.google.com/store/apps/details?id=org.nha.pmjay
किंवा
हेल्थ आयडी पोर्टलवर https://nha.gov.in/ किंवा https://healthid.ndhm.gov.in/register वर जाऊन स्वत: नोंदणी करु शकता.
याशिवाय, तुम्ही रुग्णालये केंद्रात जाऊनही तुमचा हेल्थ आयडी तयार करु शकता.
यासाठी मोबाईल नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग, घराचा पत्ता इत्यादी तपशील भरावे लागतील. तुम्ही आधार, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यांच्या साहाय्याने युनिक हेल्थ आयडी निर्माण करु शकता.हे सर्व सबमिट केल्यानंतर तुम्हाला १४ अंकचा युनिक हेल्थ क्रमांक मिळेल त्याची प्रिन्ट काढुन तुम्ही नंतर त्याचे लॅमिनिटेड करून घेऊ शकता.
लक्षात ठेवा हेल्थ कार्ड सक्तीचे नाही पण जरूरीचे आहे.