न मरणारा प्राणी : टार्डीग्रेड

 न मरणारा प्राणी : टार्डीग्रेड


आपण हे जाणतोच की, पृथ्वीवरील कोणताही सजीव हा पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जिवंत राहू शकत नाही. पण असा एक प्राणी आहे की तो पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जिंवत राहु शकतो. त्याचे नाव आहे "टार्डीग्रेड". याला वॉटर बिअर सुध्दा म्हणतात. 

न मरणारा प्राणी : टार्डीग्रेड

"टार्डीग्रेड"याचा शोध १७७७ साली लागला. याच्या १००० हुन जास्त प्रजाती आहेत.हवेची कमतरता, किरणोत्सर्ग, पाण्याचा अभाव आणि अन्नाची कमतरता असेल तर पृथ्वीवरचे बाकी सजीव मृत्युमुखी पडतात.पण टार्डीग्रेडला काहीही फरक पडत नाही. 

याशिवाय विपरीत भौगोलिक परिणाम म्हणजे जर तापमान जरी -२७२ अंश सेल्सियसच्या आसपास असले  किंवा १५० अंश सेल्सियसहुन पण जास्त असेल तरी याला काहीच फरक पडत नाही हे विशेष होय. हा ज्वालामुखींमध्ये सुध्दा जिवंत राहू शकतो.

टार्डीग्रेड जिंवत राहण्यासाठी द्रवपदार्थांवर अवलंबून असतात. ते एकपेशीय वनस्पती, लिचेन आणि मॉस ह्यांच्यातील रस खाद्य म्हणून शोषून घेऊन उदरभरण करतात. 

जेव्हा याच्या शरीरातील पाणी संपण्याच्या स्थितीला पोहचते  तेव्हा हा स्वतःचे डोके आणि पाय कासवासारखे आत घेतो आणि त्याच्या शरीराच्या हालचाली पूर्णपणे बंद होतात. त्याची चयापचय क्रिया ०.०१% वर पोचते. ह्या स्थितीची मृत्यूशी पण तुलना केली जाऊ शकते. पण अशा स्थितीतुन ह्या सजीवाला कित्येक दशकांनी पून्हा जिवंत केले जाऊ शकते.ही सुप्तावस्था असते. याला आठ पाय असतात आणि प्रत्येक पायाला ४ ते ८ नखे असतात.याची पुर्ण वाढ ०.५ मिमी (०.०२ इंच) एवढी असते.याची जगण्याची इच्छा इतकी प्रबळ असते की,तो वर्षानुवर्षे टिकुन राहतो. 

एप्रिल २०१९ मध्ये  इस्त्रायलच्या अवकाशीय यानातून शास्त्रीय अभ्यासासाठी टार्डीग्रेडना चंद्रावर नेण्यात आले पण अपघाताने ही अंतराळ सफर पुर्ण झाली नाही. परंतु अपघातावेळी हे जीव अंतराळात विखुरले गेले.शास्त्राना वाटते की, ते अजुनही जिंवत असतील. 


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম