देवांची दिपावली -देव दिपावली

देवांची दिपावली -देव दिपावली

"दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी/दिपावली असे देखील म्हणतात. "दिपावली"हा सण दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. 
देवांची दिपावली -देव दिपावली
आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात.हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो.हि झाली आपल्या कडील पारंपरिक दिपावली. 

या दिपावली नंतर बरोबर एक महिन्याने मार्गशिर्ष शु.दिवशी येणारा हा सण म्हणजे "देव दिपावली" काही ठिकाणी याला "धाकटी दिपावली" सुध्दा म्हणतात.
आपण जेव्हा अश्विन-कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो, तेव्हा चार्तुमास सुरू असतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चार्तुमासही संपतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते.

 गीतेमध्ये योगेश्वर कृष्णाने 'मासानां मार्गशिर्षोSहं' म्हणजे 'महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष' असें म्हटले आहे. हा महिना 'पुरुषोत्तम मास' म्हणून सुद्धा ओळखला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला नुकताच पावसाळा संपल्यामुळे वातावरण स्वच्छ असते आणि आदल्याच दिवशी अमावस्या झाल्याने आकाशात तारका समूह खूप तेजस्वी दिसतात जणू काही आकाशात देव आतषबाजी करत असावेत. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला 'देवदिवाळी' हे नाव पडले असावे. 
पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात.कोकण, गोवा या ठिकाणी काही गावामध्ये हा सण साजरा केला जातो.घरात गोडधोड पदार्थ केले जातात.काही गावात या दिवशी ग्रामदेवतेच्या नावाने "जत्रा" केली जाते.पैपाहुण्याना आग्रहाचे आमंत्रण दिले जाते.या दिवसात शेतीतील कामे  सुगी जवळजवळ संपलेली असते. 
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी साजरा केला जाणारा देवदीपावलीचा हा सण फार विशेष मानला जातो.याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.हा सण कोल्हापूर येथे कागल तालुक्यातील वाळवे खुर्द, पन्हाळा तालुक्यातील कोलोली तसेच कोकणातील बहुंताश गावामध्ये साजरा केला जातो.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম