विमान असो वा हेलिकॉप्टर मग ते नागरी असो वा लष्करी त्याला "ब्लॅकबॉक्स" हा असतोच.ब्लॅकबॉक्स मुळे कधीही त्या विमानाला अपघात झाला तर,तो अपघात कसा व कोणत्या कारणामुळे झाला असावा?यासाठी फार मोठे रहस्य शोधण्यासाठी उपयोग होतो. 'ब्लॅक बॉक्स' हा प्रत्येक विमानाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. ब्लॅक बॉक्स सर्व विमानांमध्ये असतो मग ते प्रवासी विमान असो, मालवाहू किंवा लढाऊ विमान असो. विमानात उड्डाण करताना विमानाशी संबंधित सर्व प्रकारच्या माहितीची नोंद करण्याचं हे साधन आहे.त्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर देखील म्हणतात. सहसा हा बॉक्स विमानाच्या मागील बाजूस सुरक्षित ठेवला जातो.
विमान किंवा हेलिकॉप्टर अपघात होतो तेव्हा तपास यंत्रणा प्रथम त्याचा ब्लॅक बॉक्स शोधतात. अपघाताचं कारण शोधण्यासाठी विमानात ब्लॅक बॉक्स बसवलेले असतात.विमानाचा ब्लॅक बॉक्स फ्लाइट डेटा रेकॉर्डर, उड्डाण दरम्यान सर्व विमान-संबंधित माहिती, जसं की विमानाची दिशा, उंची, इंधन, वेग,तापमान, हालचाल,इ. सर्व माहिती (डेटा) २५ तासांपेक्षा जास्त रेकॉर्ड केलेली माहिती साठवुन ठेवतो.विमान अपघातानंतर त्यातील दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) ज्यात विमानाशी निगडित आकडेवारी दिलेली असते तर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) असते ज्याद्वारे संभाषण रोकॉर्ड केलेले असते.
ब्लॅकबॉक्सचा असा महत्वपूर्ण उपयोग असल्याने भारताीय नागरी उड्डाण संचलनालयाने जानेवारी २००५ पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविणे अनिवार्य केले आहे.